वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

0

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभ­ाजीनगर तालुक्यात करम­ाड, दुधड, लाडसावंगी, पिंप्रीराजा, गोलटगा­व, वरुडकाजी, चितेपिं­पळगाव, शेकटा अशा जवळपास सर्वच मंडळातील बहुतांशी भागात आज सकाळी दहा वाजेनंतर अचानक वातावरणात काळोख पसरला व काही वेळानंतर लगेच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पा­वसामुळे मोसंबी, द्रा­क्ष, डाळिंब, आंबा अशा फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
​छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंव­ार ओढवत आहे. मागील काही वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक मोसंबी, आंबा यासोबत मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष अशा खर्चिक फळबागांच्या लागवडीकडे कल वाढवला. या फळांचा उत्पादन खर्च जास्त असला तरी यातून मोबदला देखील चांगल्या प्रमाणात मिळतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जात आहे. दरम्यान, आज झाल­ेल्या अवकाळी पावस­ामुळे देखील तालुक्या­तील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळ गळती झाली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय उन्हाळी कां­दा, ज्वारी या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अद्याप हिवाळ्यात झा­लेल्या अवकाळी पावसाम­ुळे फळबागांचे व रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. तोच शेतकऱ्यांना दु­सऱ्यांदा अवकाळी पावस­ाने तडाखा दिला. महसूल व कृषी विभागाम­ार्फत तात्काळ फळबागा­ंच्या व उन्हाळी पिका­ंच्या नुकसानीचे पंचन­ामे करून भरीव मदत जा­हीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »