कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर
कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर
पुणे : यंदाच्या हंगामात राज्यात शेतात कापसाला चांगला दर मिळत आहे. कसान केंद्र सरकारने हंगामातील मध्यम मळून धाग्याच्या कापसासाठी ६०८०, तर नसेच लांब धाग्याच्या कापसासाठी ६३८० धिक रुपयांचा हमीभाव निश्चित केला होता. चालू आठवड्यात खानदेश, याने मराठवाडा आणि विदर्भातील बाजार ची समित्यांमध्ये कापसाचा दर सरासरी चे आठ हजारांवर स्थिरावला आहे. या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मागील आठवड्यात राज्यात ८० उत् चे लाख गाठींच्या (एक गाठ १७० अं किलो) उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. आता सुधारित अंदाज अ ७८ लाख गाठींचा आहे. अशाच प्रकारे जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
राज्यातील कापूस हंगाम न अखेरच्या टप्प्यात आहे. मागील आठवड्यापासून दरात चढ-उतार सुरू आहे. दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी साठवलेला कापूस बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांना दरात ९ • सुधारणा होण्याची अपेक्षा असली तरीही दर साधारण आठ हजार रुपयांवर स्थिर आहे.दरम्यान, मागील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यांत राज्यात कापसाचा दर ९३०० रुपये प्रति क्विटल होता. त्या तुलनेत यंदा दर कमी आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही साठवलेला कापूस विक्रीसाठी आणताना दिसत नाहीत.
जागतिक बाजारात दर पडले ?
जागतिक बाजारात मागील वर्षी एक खंडी (३४० किलो कापूस ) कापसाला एक लाख रुपये दर होता. यंदा तो ६० हजारांवर आला आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारताचा कापूस प्रति खंडी एक हजार रुपये महाग आहे. त्यामुळे जगभरातून कापसाला मागणी कमी आहे. या शिवाय खाद्यतेलाचे दर पडले आहेत. मागील वर्षी सरकीचा दर ३५०० ते ३६०० हजार क्विंटलवर होता. यंदा हा दर ३२०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे कापूस दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे, असे शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी सांगितले.
धन्यवाद
🙏🙏🙏🙏