निर्यातबंदीनंतर कांद्याचे दरात मोठी घसरण, कांद्याचे दर निम्म्यावर!🧅

0

बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.मात्र या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.बाजारातील कांद्याचे दर घसरत असल्याने, बाजारातील कांद्याच्या दरावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कांद्याच्या निर्यातीवर बंदी आल्यानंतर २ आठवड्याच्या कालावधीत कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत.निर्यातबंदीच्या घोषणेमुळे कांद्याची मागणी देखील घटली आहे. कांद्याच्या आवकेत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याचे भाव घसरल्याने त्यांचे १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी व बाजार समितीचेही मोठे नुकसान झाले आहे. विंचूर, निफाड, येवला आदींसह लासलगाव एपीएमसी मार्केटमध्ये दररोज ४० हजार क्विंटल कांद्याची आवक होते, तर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सुमारे दीड लाख क्विंटल कांद्याचा साठा आहे. एकट्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचे दररोज ६ ते ७ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी दर घसरले आहे. बाजारातील कांद्याचे दर जवळपास १० टक्क्यांनी घसरले आहे.येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.मागील १५ दिवसांत कांद्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले आहेत.

निर्यातबंदीच्या निर्णयानंतर ७ डिसेंबरपासून दरामध्ये घसरण दिसायला सुरूवात झाली.६ डिसेंबररोजी कांद्याचे सरासरी दर ३९०० रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले होते.कांद्याच्या दरातील घसरण यापुढेही असाच कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »