Agriculture News : आता या पिकावर किडींचा हल्ला, लाखोंचे नुकसान, शेतकरी अस्वस्थ

0

Agriculture News : आता या पिकावर किडींचा हल्ला, लाखोंचे नुकसान, शेतकरी अस्वस्थ

देशात चहाच्या पीकाचं अधिक नुकसान होत आहे. कीडींचा सगळ्यात जास्त फटका चहाच्या पीकाला बसला आहे. त्यामुळे चहाचे उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून चिंतेत आहेत.
नवी दिल्ली : देशातील अनेक शेतकऱ्यांना (Farmer) आता सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पीकाचं आतोनात नुकसान झालं आहे. पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे खरीप हंगामाचं नुकसान झालंय. तर अवकाळी पावसामुळं रब्बी (rubby season) हंगामाचं नुकसान झालं आहे. सध्या अजून एक संकट शेतकऱ्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे. पीकांवरती कीड्यांनी हल्ला करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार देशात सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यापासून सुटका कशी करायची यासाठी शेतकरी त्यातील तज्ञांची भेट घेण्यासाठी इतकं-तिकडं धावाधाव करीत आहेत. राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अधिक झाल्यामुळे हा सगळा प्रकार पाहायला मिळत आहे. सध्याच्या कीडीवरती योग्य औषधांची फवारणी गरजेचं असल्याचं शेतकरी म्हणतं आहेत.
देशात चहाच्या पीकाचं अधिक नुकसान होत आहे. कीडींचा सगळ्यात जास्त फटका चहाच्या पीकाला बसला आहे. त्यामुळे चहाचे उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून चिंतेत आहेत. नेमकं काय करावं हे कुणालाचं कळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका वेबबाईटने दिलेल्या माहितीनुसार चहाच्या पीकामुळे वर्षाला किमान 14.7 करोड किलो चहाच्या पीकाचं नुकसान होत आहे.
कीडीच्या हल्लामुळं अधिक नुकसान
एका संघटनेने जाहीर केले आहे की, सगळ्यात जास्त चहाच्या पीकाचं नुकसान कीडीच्या प्रादुर्भावामुळं झालं आहे. त्यानंतर वातावरणातील बदलामुळं सुध्दा, काहीवेळेला अतिमुसळधार पावसामुळे, या तीन गोष्टीमुळे चहाच्या पीकाचं 2,865 करोड़ रुपयच्या टॅक्सचं सुद्धा नुकसान झालं आहे. आपल्याकडे सध्या ज्या पध्दतीची कीड पीकांना लागत आहे. त्याचपद्धतीची कीड यापुर्वी सुध्दा शेतात दिसत होती. पण आता नुकसान अधिक वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »