41 लाखांचा बैल; सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात 41 लाखांचा ‘सोन्या’ बैल

0

सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात 41 लाखांचा ‘सोन्या’

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रे निमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, सिद्धेश्वर दैवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

तीस एकरात हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या सोलापूरातील कृषी प्रदर्शनातील सोन्या नावाचा 41 लाखांचा बैल प्रेक्षकांच्या आर्कषणाचे केंद्र ठरला आहे. हा बैल सगळ्यात सर्वात उंच असून त्याची उंची 6.5 फूट असून लांबी 8. 5 फूट आहे.

दिवसातून दोन लिटर दूध, सात ते आठ अंडी, करडई तेल 200 एमएल, सहा प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते. या बैलाला दोनदा वैरण दिले जाते. साध्या बैलाचं वासरू दहा – पंधरा हजाराला विकले जाते. या बैलाचं वासरू सव्वा लाखाचं आहे. हा बैल शांत स्वभावाचा असून एका माणसालाही तो हाताळता येतो. या बैलापासून ब्रीड तयार केले जात असून ते देखील असेच उंच आणि देखणं तयार होते असे सोन्या बैलाचे मालक सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी गावचे रहीवासी आवटी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »