राज्यात पावसाला पोषक हवामान,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.. ⛈️

0

राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून उत्तर प्रदेशपर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात कालापासून ढगाळ हवामान असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत.

अकोला, अमरावती, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रविवार(दि.७)रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवार (दि.८ )धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.मंगळवार (दि.९) नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »