Salokha Yojana : नाममात्र शुल्काच्या बदल्यात शेतजमिनींची अदलाबदल

0

Salokha Yojana : नाममात्र शुल्काच्या बदल्यात शेतजमिनींची अदलाबदल

नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.
Pune News नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या (Stamp Duty) बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची (Agriculture Land) अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana) राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.
राज्यात ११ एप्रिलपर्यंत २६ दस्त नोंदणी झाली असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.
एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. ही योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.
सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल, तर त्याचा परतावा मिळणार नाही.
या योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल, तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताच्या वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील, असेही श्री. सोनवणे यांनी सांगितले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »