Chili Research : केशोरी मिरचीला मिळणार संशोधनाचे पाठबळ

0

Chili Research : केशोरी मिरचीला मिळणार संशोधनाचे पाठबळ

भिवापुरी मिरचीसोबतच विदर्भात रंग, चव आणि उत्पादनाच्या बाबतीत केशोरी मिरचीचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
Gondia News भिवापुरी मिरचीसोबतच (Bhivapuri Chili) विदर्भात रंग, चव आणि उत्पादनाच्या बाबतीत केशोरी मिरचीचे (Keshori Chili) स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळेच या वाणाचे जतन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
संधोनात्मकस्तरावर काम करण्यासोबतच मिरचीच्या भौगोलिक मानांकनासाठी देखील प्रयत्न केले जातील, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
नागपूरच्या भिवापूर तालुक्‍यात लागवड होणारी मिरची म्हणून भिवापुरीची ओळख होती. मात्र संशोधनात्मक पातळीवर हे मिरची वाण उपेक्षित राहिल्याने या मिरची लागवड क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भिवापुरी मिरचीचे क्षेत्र चार हजार हेक्‍टरवरून अवघ्या १०० हेक्‍टरपर्यंत मर्यादित राहिले आहे.
भिवापुरी नंतर गोंदिया जिल्ह्यात उत्पादित केशोरी मिरचीला देखील देशाच्या विविध राज्यांतून मागणी आहे. व्यापारी थेट या मिरचीच्या खरेदीसाठी गोंदिया जिल्ह्यात येतात, असे सांगितले जाते.
गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी गावशिवारात या मिरचीचे उत्पादन होत असल्याने तिला केशोरी मिरची अशी ओळख मिळाली, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्‍याम घावडे यांनी दिली.
ऑक्‍टोबर महिन्यात याची लागवड होते. भिवापुरी मिरची केवळ नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्‍यातच होते. पश्‍चिम विदर्भात त्याच्या चाचण्या घेतल्या असता झाडांची वाढ झाली नाही. केशोरी मिरची मात्र पश्‍चिम विदर्भातही चांगल्या प्रकारे उत्पादन देते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »