Masur Market : मसूरचे भाव दबावात; सरकारच्या खरेदीचा आधार मिळेल का?

0

Masur Market : मसूरचे भाव दबावात; सरकारच्या खरेदीचा आधार मिळेल का?

देशात यंदा मसूरचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. मसूर हे रब्बीतील महत्वाचे कडधान्य पीक आहे. पण सध्या मसूरचे भाव हमीभावारेक्षा कमी आहेत.
Masur Rate Update : देशात यंदा मसूरचे उत्पादन (Masur Production) वाढण्याचा अंदाज आहे. मसूर हे रब्बीतील महत्वाचे कडधान्य पीक आहे. पण सध्या मसूरचे भाव हमीभावारेक्षा कमी आहेत. पण मसूरला सरकारची खरेदी आणि तुरीसह इतर डाळींच्या दरातील तेजीचा फायदा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशात सध्या तुरीचे भाव तेजीत असल्यानं यंदा मसूरला मागणी वाढू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. मसूर उत्पादनात मध्य प्रदेश महत्वाचे राज्य आहे. मध्य प्रदेशातील बाजारांमध्ये सध्या मसूरची आवक वाढली आहे. त्यामुळं दरावर दबाव आहे.
त्यातच सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि आयातदारांना आपल्याकडील साठ्याची माहिती देण्याचा सूचना केल्या आहेत. साठ्याची माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिल्यास सरकारने कारवाईचा इशाराही दिला. याचा दबावही व्यापाऱ्यांवर आहे.
सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेच्या मसूरला प्रतिक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. तर यंदा केंद्र सरकारने मसूरसाठी ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. म्हणजेच सध्या बाजारात मसूरचे दर हमीभावापेक्षा किमान ५०० रुपयाने कमी आहेत.
देशातील मसूर उत्पादन यंदा १० ते १५ टक्क्यांनी अधिक राहण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीने मसूरची गुणवत्ता कमी झाली. मात्र पिकाला जास्त फटका बसला नाही.
पीक आणि उत्पादन चांगलं असल्याचं शेतकरीही सांगत आहेत. तर सरकारची खेरदीही यंदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या हंगामाती सरकारने मसूरची केवळ ६० हजार टनांची खरेदी केली होती. ती यंदा एक लाख टनांपेक्षा अधिक राहू शकते.सध्या मोठ्या ग्राहक बाजारात मसूरचे भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पण शेतकऱ्यांना मिळणार भाव कमी आहे. मसूरची बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर दर हमीभावाचा टप्पा पार करु शकतील, असाही अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
पण मसूरच्या बाजारावरही सरकारच्या धोरणांचा परिणाम दिसेल. एकीकडे कृषी मंत्रालयाने यंदा हमिबावात चांगली वाढ केली. पण ग्राहक कल्याण मंत्रालय भाव पाडण्यासाठी आटापिटा करत आहे.
सरकारने मसूरची चांगली खरेदी केल्यास खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळेल. नाफेडच्या खेरदीवरच बाजार बऱ्यापैकी अवलंबून राहील. पण तुरीच्या दरातील तेजीचा फायदाही मसूरला मिळताना दिसेल, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »