मराठ्यांच्या लढ्याला यश!मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या?

0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघालेला मोर्चा अखेर नवी मुंबईतून माघारी फिरला आहे.आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता.मराठा समाजालाा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या लढ्याला मोठे यश आले आहे .अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे या यशाचे शिल्पकार आहेत. पण त्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या विजयाचे श्रेय मराठा समाजाला दिले आहे.राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख कुणबी जातप्रमाणपत्रे दिली आहेत. नवीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५० लाखांहून अधिक प्रमाणपत्रे दिली जातील.

मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरे शब्द याबाबातच्या अध्यादेशाचा मसुदा आणि इतर पत्रंही जरांगेंना दिली आहेत.

वाशीतील शिवाजी चौकात झालेल्या सभेत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले. त्यावेळी त्यांनी हा अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी आता सरकारचीच असल्याचंही म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी भाषणात मांडलेले हे प्रमुख मुद्दे :

५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रणाणपत्र देण्यात यावे,आरक्षणासाठी ३५० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या.
सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रणाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल  व आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केला.
मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी १८८४ च्या जणगणनेचा विचार करावा असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »