Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती?

0
Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती?
बियांचे अंकुरण, पिकाच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली जाते.
शेती मग ती बागायती असो किंवा कोरडवाहू चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला महत्व आहे.  
बियांचे अंकुरण, पिकाच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली (Ploughing) केली जाते.
खरीप (Kharif) आणि रब्बी (Rabbi Season) पिके घेतल्यानंतर उन्हाळा (Summer Season) सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.
पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते.
अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग, किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे.
आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याच प्रमाण वाढल आहे. नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आहे असं समजाव.
तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगल आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच प्रमाण तपासण आवश्यक आहे. 
पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.
त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »