सूर्यफूल तेलाबाबत ‘आत्मनिर्भर’ कधी होणार?

0

मागणी वाढली असताना देशांतर्गत उत्पादन कमीच

सूर्यफूल तेलाबाबत ‘आत्मनिर्भर’ कधी होणार?

पुणे : देशात सूर्यफूलाच्या तेलास मागणी वाढत चालली असताना देशांतर्गत उत्पादनावर मात्र लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल ९० टक्के तेल आयात करावे लागले आहे. खाद्यतेलाबाबत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी नजिकच्या भविष्यात देशांतर्गत उत्पादन वाढवून गरज पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.

अर्जेंटिनाची राजधानी बुनोस आइरिस येथे अलिकडेच झालेल्या ‘जागतिक सूर्यफूल बिया आणि तेल परिषदे’त खाद्यतेलाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून भारतीय बाजारपेठेवर सविस्तर चर्चा झाली. देशाला दरवर्षी
सुमारे १५० ते १६० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी ६५ टक्के तेल आयात करावी लागते. २०२१-२२मध्ये एकूण वर्षा खाद्यतेल उपयोगात सूर्यफूल तेलाचा तेला वाटा ८.२ टक्के होता. गेल्या काही आहे वर्षांत सूर्यफूल तेलाच्या मागणीत झाले आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२३.८ दशलक्ष टन खाद्यतेलाची गरज
यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशाला २३.८ दशलक्ष टन तेलाची गरज भासेल, असा अंदाज आहे. करोनामुळे विस्कळीत झालेल्या बाजारपेठेचा परिणाम म्हणून १.५ दशलक्ष टनांनी मागणी
घटली होती. करोना पश्चात मागणी पूर्ववत झाली आहे. पुढील पाच वर्षांत सूर्यफूल तेलाच्या मागणीत तीन टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. २०२७-२८ पर्यंत २८.० ते २९.० दशलक्ष टनापर्यंत देशाची खाद्यतेलाची गरज वाढण्याची शक्यता आहे.
जगभरात भारत कुठे?
२०२२-२३ मध्ये जगभरात तेलबियांचे उत्पादन ६०३.५ दशलक्ष टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ मध्ये ५८०.३ दशलक्ष टन उत्पादन झाले असताना भारतात ४०.८२ दशलक्ष टन झाले होते. हे प्रमाण जागतिक उत्पादनाच्या केवळ ७ टक्के होते. २०२१-२२मधील एकूण तेलबिया उत्पादनात सूर्यफूल बियांचा वाटा ५८.०४ दशलक्ष टन म्हणजे दहा टक्के होता. २०२१-२२मधील जागतिक खाद्यतेल उत्पादनात सूर्यफूल तेलाचा वाटा १९.७२ दशलक्ष टन म्हणजे सुमारे ८ टक्के होता.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »