Fruit Crop Cultivation : ‘मग्रारोहयो’तून ८७७ शेतकऱ्यांनी केली फळपिकांची लागवड

0

Fruit Crop Cultivation : ‘मग्रारोहयो’तून ८७७ शेतकऱ्यांनी केली फळपिकांची लागवड

शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच फळे व फुले या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मग्रारोहयो) योजनेअंतर्गत साह्य दिले जाते.
Wardha News शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच फळे व फुले या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मग्रारोहयो) योजनेअंतर्गत साह्य दिले जाते. या योजनेतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ८७७ शेतकऱ्यांनी फळपिकांची लागवड केली आहे.
फळबाग लागवडीच्या लाभासाठी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास याजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी अर्थात १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ व सीमांत शेतकरी, अर्थात १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती फळबाग योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मग्रारोहयोअंतर्गत जॉब कार्डधारकावरील प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असेल आणि सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर ही योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात येते.
इच्छुक लाभार्थ्याने सातबारा व ८-अ च्या उताऱ्यासह विहित नमुन्यातील अर्ज कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कार्यपद्धतीनुसार दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लागवडीसाठी साह्य केले जाते. त्यानुसार लाभार्थ्यांना या क्षेत्राच्या मर्यादेत वृक्ष, फळझाड लागवड करता येते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »