महिलेने तिच्या सँडलमध्ये लपवले होते १६ लाखाचे सोने,कस्टमने घेतले ताब्यात..

0

एका भारतीय महिलेने तिच्या सँडलमध्ये सोन्याची चेन लपवत त्याची तस्करी केल्याचे आढळून आले. तिच्या सँडलमध्ये तिने २४० ग्रॅम वजनाच्या दोन चेन लपवल्या होत्या.मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून आणलेले सोनं जप्त केले आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाने ८ वेगवेगळ्या कारवायांमधून ३.०२ किलो सोनं आणि ४ आयफोन जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सोन्याची बाजारभावानुसारची किंमत १.७६ कोटी रुपये एवढी आहे. तर, ४ आयफोनची किंमत विदेशी चलनानुसार ११८३५० युएस डॉलर्स एवढी आहे. विविध प्रवाशांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हे सोनं लपवून तस्करी करण्यात येत होती.मुंबई – विदेशात गेल्यानंतर महागड्या वस्तू किंवा सोनं भारतात आणण्याचा मोह प्रवाशांना आवरत नाही. अनेकदा सोनं हे स्मगलिंग करुनही भारतात आणले जाते.

भारतात येऊन त्या सोन्याचा व्यापार केला जातो. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची झाडाझडती घेतली जाते. प्रवाशांच्या सामानांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यातून, अनेकदा मौल्यवान वस्तू आढळून येतात. मुंबई विमानतळावर अशाचप्रकारे पायातील सँडलमधून सोन्याच्या वस्तूंची तस्करी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे.याशिवाय, विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन III ने १६-१७ मार्च २०२४ रोजी १.७१ कोटी रुपयांचे २.७८ किलो सोने आणि ९ प्रकरणांमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या.

दरम्यान, मंगळुरू कस्टमने २० मार्च रोजी दुबईहून प्रवास करणाऱ्या भटकळ-आधारित प्रवाशाकडून ६,१९,२०० रुपये किमतीचे ९६ ग्रॅम सोने जप्त केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »