राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज..
राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने आज पुणे, नगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला असून पुणे आणि लातूर वगळता यावेळी वादळी वारे आणि वाजांसह मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवमान खात्याने वर्तविला आहे. तसेच उद्या आणि परवा (शुक्रवारी) आणि शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच नांदडे जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला.
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये ३० मार्चपासून जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. २८ मार्च ते ३१ मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर – पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.