पशु : उन्हाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे …
पशु : उन्हाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे …
* उन्हाळ्यात शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही तसेच पिलांना जास्त दुधाची गरज असते त्यामुळे शेळ्यांना हिरवा चाऱ्या नसल्यास खुराक देणे खुप गरजेचे आहे, यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक द्यावा.
* उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त
प्रमाणात बाहेर पडतो, त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती ठेवण आवश्यक आहे. शेळ्यांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प व अन्य रोगाचे लसीकरण करुन घ्यावे.
* लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व लसीकरणा नंतर इलेक्ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे, यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही.
* उन्हाळ्यात दुपारच्या सुमारास भरपूर ऊन असते, यामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते, ते टाळण्यासाठी शेळ्यांना सकाळी लवकर ६ ते ९ या वेळेस व संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
धन्यवाद
🙏🙏🙏