सॅमसंग गॅलेक्सी A15 3000 रुपयांनी स्वस्त ! तर 128GB स्टोरेजची किंमत 1500 रुपयांनी केली कंपनीने कमी…

0

Samsung Galaxy A15 5G च्या किमतीत कपात

सॅमसंगने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Galaxy A15 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. मिड रेंज सॅमसंग स्मार्टफोनच्या किमतीत आता कपात झाली आहे.Samsung Galaxy A15 फोनच्या किंमतीत 3000 रुपयांची घट कंपनीने 128GB स्टोरेजची किंमत 1500 रुपयांनी कमी केली.Samsung Galaxy A15 फोन Mediatek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे.


Samsung ने अलीडकेच Samsung Galaxy A15 5G फोन लाँच केला होता. दरम्यान, कंपनीने आता Samsung Galaxy A15 5G फोनची किंमत कमी केली आहे. होय, Samsung Galaxy A15 फोनच्या किंमतीत 3000 रुपयांची घट करण्यात आली आहे. या फोनची नवीन किंमत साइटवर लाइव्ह झाली आहे.Samsung Galaxy A15 दोन प्रकारांमध्ये येतो आणि त्या दोघांची किंमत कमी झाली आहे.

Samsung Galaxy A15 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 19,499 रुपये होती. तर, 256GB स्टोरेज व्हेरिएंट 22,499 रुपयांना उपलब्ध होता. तर, कंपनीने आता 128GB स्टोरेजची किंमत 1500 रुपयांनी कमी केली आहे, जी आता 17,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. त्याबरोबरच, 256GB व्हेरिएंटची किंमत 3000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यासह हा व्हेरिएंट तुम्ही 19,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »