Sugar Production : ब्राझीलमध्ये ४०० लाख टन साखरेचे उत्पादन शक्य

0

Sugar Production : ब्राझीलमध्ये ४०० लाख टन साखरेचे उत्पादन शक्य

ब्राझीलमध्ये एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामात ४०० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.
Sugar Market Update कोल्हापूर : ब्राझीलमध्ये एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामात (Sugar Season) ४०० लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) अपेक्षित आहे.
‘जॉब इकॉनॉमिया या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन ३० लाख टन वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ब्राझीलमध्ये साखर उत्पादनासाठी फारसे सकारात्मक वातावरण नाही. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे ऊस क्षेत्राला मोठी बाधा पोहोचली.
यातच ब्राझीलने इथेनॉलच्या उच्च किमती गृहीत धरून साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली. या दोन्हीचा नकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर झाला.
ब्राझीलच्या साखरेच्या आवकेवर बहुतांश करून जागतिक बाजारपेठेतील दर अवलंबून असतात. पण गेल्या दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेत ब्राझीलची साखर हव्या त्या प्रमाणात पोहोचली नाही. पण त्या तुलनेत भारतीय साखरेची चांगली आवक राहिली. यामुळे भारतीय साखरेलाही चांगला भाव मिळाला.
गेल्या वर्षी इथेनॉल दरामध्ये घसरण झाली. याचा फटका ब्राझीलमध्ये इथेनॉल करणाऱ्या उत्पादकांना बसला.
हे गृहीत धरता यंदा साखर कारखाने इथेनॉलपेक्षा साखरेला महत्त्व देतील, अशी शक्यता आहे.
सध्या जागतिक बाजारात साखर तेजीत आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न ब्राझीलचे साखर कारखानदार पहिल्या टप्प्यात करतील, असा अंदाज आहे.
साधारणता एक महिन्यात ब्राझीलची साखर जागतिक बाजारपेठेत पोहोचेल. तोपर्यंत तरी साखरेचे सध्या असलेले उच्चांकी दर कायम राहतील, अशी शक्यता साखर उद्योगाची आहे.
२०२३-२४ मध्ये ३३ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा १.८ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »