Salam Kisan : पवनी शहरात मोफत माती परीक्षण आणि ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन
Salam Kisan : पवनी शहरात मोफत माती परीक्षण आणि ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन
यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व माहिती होणार आहे.
श्री हनुमान जयंती उत्सव समिती, बेलघाटा वार्ड, पवनी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पवनी अणि सलाम किसान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रम ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपार २ पर्यंत, श्री संताजी सभागृह बेलघाटा वॉर्ड, पवनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बंधु-भगिनीना निमंत्रित केले आहे. विकसित शेतकरी बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवण्याने शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व माहिती होणार आहे.