NAFED Agencies : शिंदे गटाच्या आमदारांना हव्यात ‘नाफेड’च्या एजन्सी

0

NAFED Agencies : शिंदे गटाच्या आमदारांना हव्यात ‘नाफेड’च्या एजन्सी

राज्यात नाफेडच्या (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) नोडल एजन्सीसाठी शिंदे गटाच्या आमदारांनी पणन विभागाला हैराण करून सोडले आहे

.

Mumbai News : राज्यात नाफेडच्या (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) नोडल एजन्सीसाठी (NAFED nodal Agencies) शिंदे गटाच्या (Eknath Shinde) आमदारांनी पणन विभागाला (Marketing Department) हैराण करून सोडले आहे.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने वारेमाप अनुभवशून्य एजन्सी नेमल्याने केंद्र सरकारनेही कान टोचले असून, ही पद्धत चुकीची असल्याचे ताशेरे ओढणारे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे.
तरीही अन्य आठ नोडल एजन्सी नेमल्या जाव्यात यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच दबाव आणला जात आहे.
राज्यातील सोयाबीन, हरभरा, मूग, उडीद, तुरीची हमीभावाने नाफेडमार्फत खरेदी केली जाते. यासाठी नोडल एजन्सी नेमल्या जातात. अन्य राज्यांमध्ये एक किंवा जास्तीत जास्त दोन नोडल एजन्सी असतात.
मात्र राज्यात सध्या ११ नोडल एजन्सी कार्यरत असून, नव्याने सात प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक नोडल एजन्सी नाफेडने निश्‍चित केलेल्या दराने धान्य खरेदी करत असल्याने त्यात स्पर्धेचा संबंध येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »