Agrowon Podcast : भारताच्या मक्याला पाकिस्तानी मालाचा फटका

0

Agrowon Podcast : भारताच्या मक्याला पाकिस्तानी मालाचा फटका

देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पाकिस्तानच्या मक्याची स्पर्धा आहे.
१) सोयाबीनमध्ये चढ उतार (Soybean Rate)
देशातील बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाल्यानं बाजारातील आवकही वाढली आहे. त्यामुळं दर काहीसे स्थिरावले आहेत.
आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात आज नरमाई पाहायला मिळाली.
पण देशात सोयाबीन दर टिकतील, तसचं बाजारातील आवक मर्यादीत झाल्यास दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस बाजार स्थिर (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाची आवक काहीशी कमी झाली तरी सरासरीपेक्षा जास्त आहे. सध्या कापसाच्या किमान भावात सुधारणा दिसते. पण कमाल भाव स्थिरावले. कापसाला सध्या सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सुधारणा दिसली. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८२.२३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील कापसाची आवक पुढील काही दिवस अधिक राहू शकते. पण त्यानंतर आवक कमी होऊन दर सुधारतील, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कोबीचे दर दबावात
राज्यातील बाजारात कोबीची आवक जास्त आहे. सर्वच बाजार समित्यांमधील आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. पण दुसरीकडे कोबीला असणार उठाव कमी आहे. त्यामुळे कोबीच्या दरात काहीशी नरमाई दिसत आहे.
सध्या कोबीला सरासरी ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये कोबीची आवक मर्यादीत होऊ शकते. त्यामुळे दरातही सुधारणा दिसेल, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
४) पपईला चांगला उठाव
उन्हाचा चटका वाढल्यानंतर फळांना उठाव मिळतोय. पपईलाही मागणी वाढल्याचं व्यापारी सांगत आहेत. बाजारातील पपई आवकही काहीशी अधिक दिसते. काही बाजारांमध्ये दरात चढ उतार सुरु आहेत. पण पपईला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळतोय.
पुढील काळात पपईची बाजारातील आवक कमी होऊन दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »