Container House : कासारखेडच्या शेतकऱ्याचे ‘हायटेक मचाण’

0

Container House : कासारखेडच्या शेतकऱ्याचे ‘हायटेक मचाण’

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्याला जिवाची जोखीम घेत शेतात मुक्काम करावा लागतो. या जागलीच्या काळातील जोखीम करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी आधुनिक मचाण तयार केले आहे.
योगेश लिचडे यांचे गावस्तरावर अवजार निर्मिती (Agriculture mechanization manufacturing) आणि दुरुस्तीचे छोटे वर्कशॉप आहे. सतत नावीन्याचा ध्यास घेतलेले योगेश कमी खर्चाची शेतीउपयोगी अवजारे तयार करत असतात. त्यासाठी अनेक वेळा सामाजिक माध्यमांच्या साह्याने परदेशातील यंत्रे, अवजारे यांचे व्हिडिओ पाहत असतात.
एकदा त्यांच्या पाहण्यात इस्राईलमधील ‘कंटेनर हाउस’ आले. त्यात एका कंटेनरमध्ये किचनसह सर्व सुविधा असलेले छोटे शेतघर तयार केलेले पाहिले. मग त्यांनी कंटेनर हाऊसचे अनेक प्रकार इंटरनेटवर पाहिले.
भारतीय शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी थोड्याशा उंचावर बांधलेल्या मचाणावर राहतो. (या रात्रीच्या निवासाला विदर्भामध्ये ‘जागली’ असे म्हणतात.) योगेश यांना कंटेनर हाउस आणि मचाण यांच्या एकत्रीकरणाची कल्पना सुचली.
पावसाळ्यात वीज पडल्यामुळे योग्य आसऱ्याविना थांबलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमीही त्यांच्या वाचनात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यात झाडावरील तात्पुरत्या मचाणावरून एका शेतकऱ्याला बिबट्याने पळविल्याचीही घटना घडली होती.
त्यामुळे शेतात जागलीसाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे जिवाचा धोका सतत राहतो. त्यापासून बचावाच्या उद्देशाने त्यांनी आधुनिक मचाण तयार करण्याचा ध्यास घेतला.
भारतीय शेतकऱ्यांचा विचार…
इस्राईलमधील ‘कंटेनर हाउस’च्या निर्मितीचा खर्चच मुळी चार लाखाच्या घरात जातो. त्यानंतर त्यातील सोयीसुविधा आणि नफा धरल्यानंतर शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांपर्यंत ते उपलब्ध होतात.
भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांच्यासाठी मचाणाची निर्मिती करण्यासाठी पहिल्यांदा हलक्‍या प्रतीच्या साहित्य (ॲंगल, लोखंडी शीट) वापरून मचाण तयार केले. मात्र ते वेगवान वाऱ्यामध्ये टिकू शकणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »