वादळी पावसाचा आजही इशारा; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज 

0

Krushi News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यातील बहुतांशी भागात तापमान ४० अंशाच्या दरम्यान पोचले. तर राज्यभरात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस झाला.

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा इशाराही दिला. 

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा पुढील पाच दिवसांसाठी कायम ठेवला. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. 

तर आज धुळे, नंदूरबार, जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »