Cotton Market : कापूस दर वाढणार; पण कशामुळं?

0

Cotton Market : कापूस दर वाढणार; पण कशामुळं?

Cotton Rate : सध्या कापूस असलेले अनेक शेतकरी पुढील एक ते दीड महिन्यात कापूस विकतील. पण एकाच दरपातळीवर हा कापूस बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे.
Cotton Rate Update : कापूस बाजारात सध्या शेतकऱ्यांकडे किती कापूस (Cotton) शिल्लक आहे, यावरून मतभेद दिसत आहेत. उद्योगांच्या मते शेतकऱ्यांकडे अजूनही जास्त कापूस आहे. त्यामुळं पुढील दीड महीना आवकेचा दबाव असेल.
पण देशातील कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज आणि बाजारात आलेला कापूस, यावरून उद्योगांना वाटतं त्याप्रमाणात कापूस शिल्लक नाही, हे स्पष्ट आहे. तसेच पुढील काळात कापूस दरात सुधारणा होईल, असा अंदाज आहे.
कापूस बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा झाली. त्यानंतर दर काहीसे स्थिरावले. दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली. यामुळं कापूस विक्रीही वाढली.
दरवाढीची अपेक्षा असणारे, पण जास्त दिवस थांबू शकत नाहीत, असे शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणखी शेतकरी कापूस विकतील, असा अंदाज उद्योगांकडून व्यक्त केला जातोय.
मार्च महिन्यात कापसाचे भाव दबावात होते. कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कापूस विकला. म्हणजेच बाजारात कापसाची आवक दाटली. दुसरीकडं फेब्रुवारीपासूनच उद्योग फायद्यात काम करत होते.
पण शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत, हे माहित असल्यानं दर कमीच ठेवले गेले. शेतकऱ्यांनीही दर वाढत नाहीत म्हटल्यावर विक्री वाढवली.
पण आता स्टाॅक असलेले शेतकरी दरवाढल्याशिवाय कापूस विकणार नाहीत, हे माहित असल्यानंच भाव वाढवले गेले, असे अभ्यासकांनी सांगितले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »