HSC Result : उद्या लागणार बारावीचा निकाल !’या’ वेबसाईटवर पाहा निकाल..
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल उद्या (दि .२१ मे) रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य मंडळानी दिली आहे.उद्या (दि .२१ मे) दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल लागणार आहे. निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल तयार झाल्याची , त्रुटीविरहित निकाल जाहीर करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया झाली असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यभरात विविध मंडळांशी संलग्न दहावी, तसेच बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी सीबीएसई व आयसीएसई मंडळमार्फत दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले असून, कोणतीही पूर्वसूचना न देता ‘आयसीएसई’ ने दि.६ मे रोजी आणि ‘सीबीएसई’ने दि. १३ मे रोजी एकाच दिवशी हे दोन्ही निकाल जाहीर केले. राज्य मंडळाच्या परीक्षांचा निकाल मात्र अद्याप जाहीर झालेला नसून, सर्व परीक्षार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. हा निकालही लवकरच जाहीर होणार असून, बारावीचा निकाल उद्या, तर दहावीचा निकाल त्यानंतर आठवडाभराने जाहीर होणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. निकाल तयार झाले आहे. राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील एक लाख ६८ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ७८,५२७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. नाशिक जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल :
▪️ mahresult.nic.in
▪️ http://hscresult.mkcl.org
▪️ www.mahahsscboard.in
▪️ https://results.digilocker.gov.in