Turmeric Market : हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीचा रंग बेरंग

0

Turmeric Market : हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीचा रंग बेरंग

यंदा हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत हळदीला पोषक असे वातावरण होते. पिकावर कोणत्याही रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.
Sangli News : वेळ सकाळी अकराची… सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी (Turmeric Producer Farmer) सांगली बाजार समितीत हळद विक्रीला घेऊन आले होते.
सौदे सुरू झाले अन् हळदीचे दर (Halad Rate) ऐकताच गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीच्या दरात (Turmeric Rate) प्रति क्विंटलला ७०० ते ८०० रुपयांची पडझड सुरू झाली आहे, असा सूर हळद उत्पादकांचा होता.
त्यामुळे हळद विकायची की ठेवायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे हळद उत्पादकांच्या चेहऱ्यावरचा रंगच बेरंग झाला आहे.
यंदा हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत हळदीला पोषक असे वातावरण होते. पिकावर कोणत्याही रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे दर्जेदार हळदीचे उत्पादन हाती लागले आहे. यंदाच्या हंगामातील हळद काढणी सुरू झाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजार समितीत नवीन हळद विक्रीस येऊ लागली आहे.
सांगली जिल्ह्यासह सातारा, कर्नाटक राज्यातील शेतकरी हळद शेतातून थेट विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होत आहेत. दररोज सुमारे ११ ते १२ हजार पोती (एक पोते ५० किलोचे) सौद्यासाठी येत आहेत.
मंगळवारी (ता. १४) सकाळी शेतकरी हळद घेऊन बाजार समितीत दाखल झाले. सौदे सुरू झाले. शेतकरी प्रत्येक सौद्याच्या ठिकाणी जाऊन हळदीच्या दराचा अंदाज घेत होते. हळदीचे दर ऐकताच कष्टाने पिकविलेल्या हळदीला चांगले दर कसे मिळणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती.
गेल्या दोन वर्षांत हळदीला चांगले दर मिळाले. परंतु यंदा त्या तुलनेत सुरुवातीलाच दरात प्रतिक्विंटलला ७०० ते ८०० रुपयांची पडझड झाली आहे. दर्जेदार हळद पिकविली आहे. केलेला खर्च कसा मिळणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »