Dairy Business Useful Machine : जनावरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्र

0

Dairy Business Useful Machine : जनावरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्र

पशुपालकही अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला व्यवसाय अधिक फायदेशिर कसा करता येईल यासाठी प्रयत्नशिल असतात. मोबाईलमुळे तर आजकाल कोणतही तंत्रज्ञान शिकण अगदी सहज शक्य झालं आहे.
Dairy Business : दुग्धव्यवसाय अधिक फायदेशिर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहेत. यासाठी विविध कंपन्यांमार्फत विविध यंत्रे, उपकरणे तसेच अॅप विकसीत केले जात आहेत.
पशुपालकही अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला व्यवसाय अधिक फायदेशिर कसा करता येईल यासाठी प्रयत्नशिल असतात. मोबाईलमुळे तर आजकाल कोणतही तंत्रज्ञान शिकण अगदी सहज शक्य झालं आहे.
मानवा प्रमाणे जनावरांना बोलता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही. आपल्याला होणार त्रास ते केवळ आवाज काढून किंवा हालचाल करुन व्यक्त करतात. पशुपालकाला जनावरांना होणारा त्रास ओळखता येईलच असे नाही.
काही पशुपालकांकडे जास्त प्रमाणात जनावरे असतात. त्यामुळे प्रत्येक जनावराकडे लक्ष देता येत नाही. ज्यावेळी आपल्याला या आजाराची माहिती मिळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
अशा पशुपालकांसाठी केरळ, कोची येथील कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप कंपनी ब्रेनवायर वेस्टॉकने जनावरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्र विकसीत केले आहे. 
हे यंत्र जनावराच्या कानाला लावता येते. जनावराला कोणता आजार झाला असेल किंवा काही त्रास असेल तर हे यंत्र त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवेल, तसेच रोगाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब सतर्क करेल.
त्यामुळे जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवणे शक्य होईल. याशिवाय यंत्रामुळे जनावरातील माजाचे चक्र, गाभण काळातील बदल, आजाराची लक्षणे ओळखून उपचार करता येतील.  
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »