SSC Result 2024 : आज होणार दहावीचा निकाल जाहीर! ‘या’ वेबसाईट वर दिसेल निकाल..
महाराष्ट्र बोर्ड दहावी परीक्षा निकाल 2024:
दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध केला जाणार आहे. या निकालाची प्रतीक्षा १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थी करत आहेत.राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाने १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावी बोर्ड परीक्षा पारंपारिक पद्धतीने घेतली होती.
राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आज (२७ मे) रोजी
यासारख्या अधिकृत संकेतस्थळांवर MSBSHSE SSC निकाल पाहू शकतात.
ऑनलाइन महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल 2024 कसा पाहाल?
Step 1 – अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in ला भेट द्या
Step 2 – महाराष्ट्र SSC निकाल 2024 लिंकवर क्लिक करा
Step 3 – दहावी निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड या खिडकीत तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा
Step 4 – “निकाल पहा” वर क्लिक करा
Step 5 – तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र SSC निकाल 2024 दाखवला जाईल
Step 6 – पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि जतन करा.