Rice Sowing : भात पेरणीसाठी उपयुक्त यंत्रे

0
bhat

Rice Sowing : भात पेरणीसाठी उपयुक्त यंत्रे

Rice Production : पारंपरिक पद्धतीने भाताची पेरणी केली जात असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत चालली आहे. तसेच विविध कारणांमुळे उत्पादकताही कमी होत आहे. हे टाळण्यासाठी सुधारित पेरणी किंवा लागवड पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. या लेखामध्ये भात पेरणीसाठी उपयोगी अशा यंत्रांची आपण माहिती घेऊ.
Rice Update : गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात प्रत्यक्ष पडणाऱ्या पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी. आहे. हवामान बदलामुळे पर्जन्यमानात काहीशी अनिश्‍चितता आली आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण जरी तितकेच राहत असले, तरी पाऊस पडण्याचे दिवस कमी होत चालले आहेत.
पावसाळा ४ महिन्यांचा असला तरी प्रत्यक्ष पडणारा पाऊस ४८ ते ५४ दिवसांतच पडून जातो. या प्रदेशात भात (धान) खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. येथे लागवडीसाठी प्रामुख्याने पारंपरिक पद्धतींचा वापर होतो. त्यामुळे खर्च वाढत चालला आहे, त्या तुलनेत उत्पादकता कमी होत चालली आहे. त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
पूर्व विदर्भात भात पारंपरिक आवत्या पद्धती (भात बियाणे फेकून) व पेरीव आवत्या (पेरणी पद्धत) या दोन पद्धतीने घेतला जातो. पारंपरिक आवत्या पद्धतीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत करून जमीन वापसा स्थितीत आल्यावर प्रति एकरी ३०-३५ किलो भात बियाणे विखरून टाकले जाते.
जमीन विखरून बियाणे झाकले जाते. साधारणतः एका महिन्यानंतर उगवलेल्या भात रोपांमध्ये हलकी नांगरण केली जाते. या जमिनीच्या मशागतीमुळे पिकास फुटवे फुटतात. तसेच तण नियंत्रणास मदत होते. पूर्व विदर्भात वैनगंगेच्या खोऱ्यात प्रचलित या पद्धतीला स्थानिक भाषेत ‘बासी’ म्हणतात.
मर्यादा : या पद्धतीमध्ये कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, काढणीमध्ये अडचणी येणे अशा समस्या दिसून येतात. उत्पादकता कमी राहते.
रोवणी पद्धतीत चिखलणी, भाताची रोपवाटिका तयार करणे, रोपांची पुनर्लागवड (रोवणी) करणे या कामांसाठी अधिक मनुष्यबळ लागते. एकूण उत्पादन खर्चाच्या ३० ते ३५ टक्के यावरच खर्च होतो. त्याच सध्या मजुरांची वेळेवर उपलब्धता हा मोठा प्रश्‍न झाला आहे.
त्यामुळे रोवणीला उशीर होतो. या उशिरामुळे पिकावर कीड व रोगाचे प्रमाण वाढून, उत्पादनात २० ते ३० टक्के घट येत असल्याचे काही प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भात पिकामध्ये पेरणी यंत्राचा वापर वाढविण्याची गरज आहे.
पेरीव आवत्या (पेरणी पद्धत) : पारंपरिक आवत्या पद्धतीच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये जमिनीतील ओलाव्याचे अधिक संवर्धन, निविष्ठांचा कार्यक्षम वापर, शेती कामांची वेळेत पूर्तता आणि पर्यायाने उत्पादन खर्चात घट होते. यासाठी वेगवेगळी यंत्रे उपलब्ध असून, त्याद्वारे पेरणीसोबतच खतही देता येते. याद्वारे भाताप्रमाणे गहू, तीळ, जवस, लाखोरी व हरभरा यांचीही पेरणी करता येते
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »