Cashew Nut Rate : काजू बी दर घसरणीविरोधात उत्पादकांचा वैभववाडीत मोर्चा

0

Cashew Nut Rate : काजू बी दर घसरणीविरोधात उत्पादकांचा वैभववाडीत मोर्चा

प्रतिकिलो १५० रुपये दर; आयात शुल्क वाढविण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी ः काजू बी दर घसरणीवरून काजू उत्पादकांनी बुधवारी (ता. २९) वैभववाडी येथे मोर्चा काढला. काजू बीला प्रतिकिलो १५० रुपये दर द्यावा, आयात शुल्क वाढवावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

शासनाने काजू बी दर प्रकरणात लक्ष न घातल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
काजू बीचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर घसरला आहे. त्यामुळे काजू उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या मिळत असलेल्या काजू बी दरातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे संतप्त झालेले काजू उत्पादक शेतकरी बुधवारी वैभववाडीतील संभाजी चौकात एकवटले.
तेथे जोरदार घोषणाबाजी करीत दत्त मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ‘काजू बीला १५० रुपये दर मिळालाच पाहिजे,’ ‘संघटित व्हा, संघटित व्हा, काजू बागायतदारांनो संघटित व्हा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
 वयाच्या ७२ व्या वर्षी निधन
तेथे जोरदार घोषणाबाजी करीत दत्त मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ‘काजू बीला १५० रुपये दर मिळालाच पाहिजे,’ ‘संघटित व्हा, संघटित व्हा, काजू बागायतदारांनो संघटित व्हा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
Cashew Nut Rate
Cashew Rate : काजू बीच्या दरात का होतेय घसरण?
दरम्यान, काजू बागायतदारांची दत्त मंदिरात बैठक झाली. या बैठकीत विलास देसाई यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली. ‘काजू बागायतदार एकवटल्याशिवाय शासन दखल घेणार नाही.
सध्याच्या दरातून उत्पादन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे काजू बागायतदार कर्जबाजारी होत आहे. शासनाने आयातशुल्कात वाढ करावी, काजूच्या ब्रॅण्डिंगसाठी उपाययोजना कराव्यात,’’ अशी मागणी त्यांनी केली.
काजू बागायतदार विजय रावराणे, महेश रावराणे, सुनील रावराणे, मंगेश कदम, इंद्रजित परबत्ते, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.
दर ठरविणारी यंत्रणा उभी करा
कारखानदार आणि व्यापारीच काजू बीचा दर ठरवितात. त्यामुळे दर ठरविणारी यंत्रणा उभी झाली पाहिजे. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी. असंघटित काजू बागायतदारांमुळे दर घसरत आहेत.
काजू बी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांची तपासणी करावी, अशी मागणी काजू उत्पादकांनी केली.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »