Hapus Mango Market : हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले

0

Hapus Mango Market : हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले

उन्हाच्या झळा वाढत जातील तसा आता आंब्याचा गोडवाही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे.
Hapus Mango Market मुंबई : उन्हाच्या झळा वाढत जातील तसा आता आंब्याचा गोडवाही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस (Hapus Mango) आणि मद्रास आणि कर्नाटकातील अन्य ठिकाणांहून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक (mango Arrival) वाढल्याने दरही (Mango Rate) उतरत आहेत. मात्र, एप्रिल महिन्यातील आंब्याची आवक कमी होईल, असा आंबा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील विविध ठिकाणांहून ४५ ते ५० हजार पेट्या हापूस आंबा येत आहे. तसेच मद्रास हापूस आणि अन्य ठिकाणच्या आंब्यांची सरासरी २० हजार क्रेट येत आहेत. सध्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या देवगड हापूस आंब्याचा डझनाचा दर ७०० ते १५०० रुपयांवर आहे. तर मद्रास हापूसचा दर ५०० ते १००० रुपयांवर आहे.
सरासरी दर २४ वरून १९ हजारांवर
आंब्यांची आवक वाढत जाईल तसा दर कमी होत असून १६ मार्च ते २७ मार्च दरम्यान घाऊक बाजारात क्विंटलमागे सहा ते सात हजारांनी दर उतरला आहे. त्यामुळे १५०० ते २००० रुपये डझन असलेला आंबा आता ६०० ते ७०० रुपयांपासून १२०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »