Textile Production : केळीच्या खोडांपासून धाग्यांची निर्मिती; कापड, कागद उद्योगात वापर

0

Textile Production : केळीच्या खोडांपासून धाग्यांची निर्मिती; कापड, कागद उद्योगात वापर

केळी घड काढणीनंतर झाडाचे मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. केळी खोडापासून धागे तयार करता येतात. या धाग्यांचा वापर कागद निर्मिती, ऊर्जा निर्मिती, धागे निर्मिती तसेच जैवप्लास्टिक निर्मितीमध्ये करता येतो
मनीषा जगदाळे, श्रीजा मजुमदार
केळीच्या खोडापासून चांगल्या प्रकारे धाग्यांची निर्मिती करता येते. केळी खोडापासून धागे तयार करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. यामध्ये प्रामुख्याने खोड सडवून, रासायनिक प्रक्रियेचा अवलंब तसेच यंत्राचा वापर करून धागे काढता येतात.
खोड सडवून धागा काढणे आणि रासायनिक प्रक्रिया पद्धत वेळखाऊ आहे. यामध्ये उत्पादनाची गुणवत्ता फारशी चांगली राहात नाही. त्यापेक्षा धागे काढण्यासाठी यंत्राचा वापर केल्याने वेळ आणि खर्च वाचतो. धाग्याची गुणवत्ता, रंग आणि लांबी चांगली मिळते.
केळीच्या खोडापासून तयार केलेले धाग्यांचा वापर पारंपारिक हस्तकला आणि कापड तयार करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय नैसर्गिक धागे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने केळी खोडापासून धागा निर्मितीचे यंत्र विकसित केले आहे.
कापड निर्मिती :
केळीच्या धाग्यापासून कापड निर्मिती केली जाते. त्यासाठी संशोधन संस्थेने तंत्रज्ञान विकसित केले आहे.
केळी धाग्यापासून तयार केलेल्या कापडाची गुणवत्ता ही कापसापासून तयार केलेल्या कापडाइतकीच असते. केळी धाग्यापासून बनवलेल्या कापडाची लवचिक आणि कडकपणा थोडा जास्त असतो, परंतु सॉफ्टनर फिनिशिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा कडकपणा कमी करता येतो.
धाग्यांचा उपयोग :
केळी खोडापासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर हस्तकला वस्तू, पिशव्या, उच्च-गुणवत्तेचे कापड, दोरी, पॉलिमर मॅट्रिक्समध्ये मजबुतीकरण साहित्य, बांधकाम साहित्य, माशांचे जाळे, कागदी पुठ्ठा, उशा, कुशन, गाद्या, पिशव्या, पाय पुसणी, योगा चटई, पडदे निर्मितीसाठी केला जातो.
केळी पानाच्या प्लेट :
१) अलीकडे पर्यावरणपूरक ( Environmentally friendly ) उपक्रमांच्या माध्यमातून केळी पानांचा वापर वाढत आहे.
२) आपल्याकडे परंपरेने केळीची पाने जेवण वाढण्यासाठी आणि वाफवलेले अन्न तयार करण्यासाठी करतात.
केळी पानाचे फायदे:
१) पानांमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन यांसारखी संयुगे असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहकता विरोधी गुणधर्म असतात. ही संयुगे रक्त शुद्ध करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यास उपयोगी आहेत.
२) केळी पानांमध्ये असलेले क्लोरोफिल हे पोट आणि आतड्यांवरील श्लेष्माच्या अस्तरासाठी उपयुक्त आहे. हे पचनास मदत करते. आतड्यांसंबंधी अल्सर टाळण्यासाठी उपयुक्त आहे.
३) जखमा, पुरळ आणि कीटक चावणे यासारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करतात.
४) पानांमध्ये जंतुनाशक आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचा थंड ठेवतात.
५) केळीचे पान हे ते पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, कार्बोहायड्रेट्ससह पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »