Yavatmal DCC Banck : थकित कर्जावरून जिल्हा बॅंक देणार आठ हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा

0

Yavatmal DCC Banck : थकित कर्जावरून जिल्हा बॅंक देणार आठ हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा

कापूस व इतर शेतमालाचे दर दबावात आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली असतानाच आता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कलम १०१ अंतर्गंत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
Yavatmal News कापूस व इतर शेतमालाचे दर (Cotton Rate) दबावात आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली असतानाच आता थकीत कर्जाच्या (Loan Due) वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने (Yavtmal DCC Bank) कलम १०१ अंतर्गंत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र रोष व्यक्‍त केला जात आहे.
गेल्या हंगामात शेतकऱ्यांना संततधार पावसापासून पिकाचा बचाव करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पावसामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता प्रभावित झाली.
त्यातच गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही शेतमालाला चांगले दर मिळतील आणि उत्पादकतेमधील तूट भरून निघेल, ही आशा असताना शेतमालाचे दर दबावात असल्याने शेतकऱ्यांचे ते स्वप्नही धुळीस मिळाले.
अशा स्थितीत आता जिल्हा बॅंकेकडून कर्ज वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या ४० हजारावर सभासदांकडे ४५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील आठ हजारावर शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात एक रुपयांचाही परतावा केला नाही. यामुळे अशा थकबाकीदार शेतकऱ्यांवर सहकार कायद्यातील कलम १०१ अंतर्गंत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात सेवा सोसायटींना सूचना देणात आल्या असून, त्यानुसार कार्यवाहीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी ठरावीक कालावधीनंतर कर्जाची परतफेड न केल्यास बॅंकेचे एनएपी खातेधारक वाढतात.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »