लासलगाव मध्ये मुसळधार पावसाने लावली हजेरी..

0

लासलगाव आणि परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे.विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून लासलगाव परिसरातील अनेक गावांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे.लासलगावमध्ये सोमवारी दुपारी २ तासांपेक्षा जास्त काळ मुसळधार पाऊस झाला.लासलगाव मध्ये सोमवारी (१० जून) मुसळधार पाऊस झाला आहे.  परंतु, पेरणीसाठी अजून थोडा पाऊस हवा आहे.कृषी विभागाच्या मते, पेरणीसाठी ४० ते ६० मिलिमीटर पाऊस आवश्यक आहे.म्हणून, शेतकऱ्यांनी आजून थोड्या दिवसांपर्यंत पेरणीसाठी वाट पाहणे चांगले.हवामान विभागाने पुढील काही दिवसांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाने उद्या (बुधवार, १३ जून २०२४) लासलगाव मध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, विजेच्या गडगडाटाची शक्यता ही आहे. त्यामुळे, नागरिकांनी अतिरिक्त सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »