मान्सून केरळ मध्ये दाखल

0


पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. हे वादळ उत्तरेकडे सरकताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) केरळातील आगमनास पोषक हवामान झाले आहे. मॉन्सून आज  (ता. ९) देशाच्या भूभागाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती .

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून मंगळवारी (ता. ६) रात्री समुद्राच्या आग्नेय आणि पूर्व मध्य भागात पान बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. समुद्रातून उत्तरेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. ७) ही प्रणाली गोव्यापासून ८८० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, मुंबईपासून ९९० किलोमीटर नैर्ऋत्येकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून १०६० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्याया चक्रावादळाची तीव्रता वाढल्याने ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच  कालपासून(ता. ८) महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला असून, किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एल निनो’च्या सावटामुळे यंदा पावसावर परिणाम होण्याची चर्चा सुरू असतानाच, मॉन्सूनचे केरळमधील आगमन तब्बल सात दिवसांनी लांबले

जून ते सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस शक्य

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »