Weather Update : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान
Weather Update : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान
गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे : राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान (Weather) होत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळर ठिकाणी हलक्या सरींनी शिडकावा केला. गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा जाणवत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यतील उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १३ अंशांच्या पुढे कायम आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏