Unseasonal Rain : वादळी पावसाचा वीस हजार शेतकऱ्यांना फटका
Unseasonal Rain : वादळी पावसाचा वीस हजार शेतकऱ्यांना फटका
जिल्ह्यात वादळी पावसासह वारे व गारपिटीचा सुमारे १९ हजार ८९९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यात एकूण १९ हजार ८९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
Unseasonal Rain नांदेड : जिल्ह्यात वादळी पावसासह वारे व गारपिटीचा (Hailstorm) सुमारे १९ हजार ८९९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यात एकूण १९ हजार ८९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
यात जिरायती अकरा हजार ३७६ हेक्टर, बागायत दहा हजार ६३६ हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे एक हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे (Crop Damage) बाधित क्षेत्र असल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वादळी वारे व गारपीट झाली होती. यात अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा समावेश आहे.
या गारपिटीमुळे तीन टक्क्यांनुसार ९१७ शेतकऱ्यांच्या ६९८ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. उरलेले पंचनामे येत्या चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
धन्यवाद
🙏🙏🙏