Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीचा रब्बी पिके, फळबागांना तडाखा

0

Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीचा रब्बी पिके, फळबागांना तडाखा

ऐन सुगीत तोंडचा घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Parbhani News परभणी-हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडलांत रविवारी (ता. १९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या दोन जिल्ह्यांतील विविध भागात सलग तीन चार दिवसांतील वादळी वारे, अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट यामुळे रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांना मोठा तडाखा (Crop Damage) बसला आहे.
पाऊस, गारपीट थांबत नसल्यामुळे पीकहानीच्या क्षेत्रात दिवसागणिक भर पडली आहे. ऐन सुगीत तोंडचा घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शनिवारी (ता. १८) दुपारी तीननंतर आणि रात्री परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलांत तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, हिंगोली, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.
वादळी वारे, गारपिटीमुळे ज्वारी, गव्हाची उभी पिके आडवी झाली. ज्वारीचा कडबा, हरभरा, हळद भिजली आहे. केळी, संत्रा, मोसंबी, चिकू आदी फळबागांचे नुकसान झाले. कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका 
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »