Animal Husbandry : चौकटीबाहेरचे पशुपालन केंद्रस्थानी यावे

0

Animal Husbandry : चौकटीबाहेरचे पशुपालन केंद्रस्थानी यावे

कोरडवाहू क्षेत्राचा आधार असलेली स्थानिक जनावरे आणि त्यांच्या जातींबद्दल ठोस कार्यक्रम आणि धोरणात्मक विचार होणे आवश्यक आहे. पशूंच्या स्थानिक जातींचे संवर्धन आणि कोरडवाहू क्षेत्र हे एकमेकांना पूरक आहेत.
Animal Care भारताच्या एकंदर पशुजैवविविधतेचे (Animal Biodiversity) मूळ हे परंपरागत पाळल्या गेलेल्या पद्धतीमध्ये आहे. ही पद्धत शेकडो वर्षांपासून सर्वत्र स्वीकारली गेली आणि फोफावली. अन्नसुरक्षा (Food Security) आणि इतर गरजांसाठी अनेक लोकसमूह आणि शेतकरी या पद्धतीवर अवलंबून आहेत.
अन्न उत्पादनासाठी अंदाजे ७३ टक्के भाग कोरडवाहू पशुपालनावर (Dry Land Animal Husbandry) अवलंबून आहे. हे पशुपालन सर्वसाधारण चौकटीपेक्षा वेगळे असते. ते इंधन, खते आणि कीटकनाशके अशा बाह्य संसाधनांवर अवलंबून नाही.
अशा प्रकारची जीवनपद्धती स्वीकारणाऱ्या लोकांनी स्थानिक पशूंच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण जाती तयार केल्या आहेत. या जातींची जनावरे लांब पल्ल्याचे अंतर चालू शकतात, प्रतिकूल हवामानात जिवंत राहू शकतात आणि उत्पादन देऊ शकतात.
म्हणूनच अशा पद्धतीच्या पशुपालनातच आपल्याला बाविसाव्या वेतातील गाय, म्हैस किंवा सात- आठ वर्षांची कोंबडी बघायला मिळते. इथे उत्पादनाच्या प्रमाणापेक्षा शाश्‍वती महत्त्वाची आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »