*दरेगाव येथे रंगपंचमीला भव्य कानिफनाथ यात्रा.*

0

*दरेगाव येथे रंगपंचमीला भव्य कानिफनाथ यात्रा.* 

               

*माझे गाव आणि गावची यात्रा.*
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे
सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय…
आज मी तुम्हाला अशाच एका गावच्या यात्रेबद्दल सांगणार आहे.महाराष्ट्राच्या विविध भागांत अनेक देवी-देवतांचे मंदिरे आहेत.प्रत्येक मंदिरात वर्षातून एकदातरी यात्रा भरते.
तसेच *नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव ते म्हणजे “”दरेगाव””(विश्राम मढी)* पण बोलतात.
आता तुम्ही बोलणार एकाच गावाचे दोन नावे कशी पडली असणार?
पण त्याला कारण पण तसेच आहे.दरेगाव ची लोकसंख्या अवघी 4 हजाराच्या आसपास गावही अगदी छोटस. गावाला लागूनच मोठं-मोठे डोंगर आहे.गावाच्या पाण्याचे उगमस्थान असलेले *भंडारदरा, वाघाडदरा, रोकडोबा, मेसण्याचा डोंगर.* अशा बऱ्याच डोंगर दऱ्यात वसलेले आहे हे गाव म्हणून कदाचित “दरेगाव” हे नाव पडलेले असावे.!
*दुसरं नाव (विश्राम मढी)*
ह्या नावाला एक आख्यायिका आहे…
आज मी ज्या यात्रेबद्दल सांगत आहे.त्यातून मिळालेले गावाला दुसरे नाव *विश्राम मढी*
*(कागोदपत्री दरेगाव म्हणूनच आहे.)*
आपल्या सर्वांना माहितीच असेल अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यात *कान्होबाची मढी* नावाचे गाव आहे.”‘जिथे नऊ नाथांपैकी एक असलेल्या *कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी आहे.*
दरेगाव ला पण विश्राम मढी नावाने ओळखायला हेच एक कारण आहे.
आख्यायिका अशी आहे. जेव्हा कानिफनाथ महाराज गिरनार पर्वतावरून तपश्चर्या पूर्ण करून त्यांच्या 700 शिष्यां सोबत विश्वभ्रमंती करून जात होते. त्यावेळेस त्यांनी काही काळ ह्या गावात वास्तव्य केले होते (विश्राम) केला होता.आणि मग ते पुढील प्रवासाला ते मढी गावी गेले.
*नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी*
हेच कानिफनाथ महाराज दरेगाव चे ग्रामदैवत पण आहे.प्रत्येकवर्षी *फाल्गुन कृ. पंचमीला* मोठी यात्रा भरते कानिफनाथ महाराजांची दरेगाव ची यात्रा 4-5 दिवस असते.
*यात्रेची सुरुवात…….*
होळी पेटवून गावकरी ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ह्या जयघोषाने यात्रेला प्रारंभ करतात.
रंगपंचमी च्या दोन दिवस अगोदर मनोरंजन म्हणून महाराष्ट्राची लोककला असलेला तमाशाचा फड गावात दाखल होतो.
होळी पासून पुढचे पाच दिवस नाथांच्या मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यात्रेचा मुख्य दिवस असतो तो म्हणजे *रंगपंचमी* चा रंगपंचमी च्या दिवशी सकाळी 6:00 वाजता नाथांच्या रथाचे प्रस्थान गाव भ्रमंतीसाठी होते.बैलगाडी वर अत्यंत आकर्षक पद्धतीने हा रथ सजवतात.हा रथ गावाच्या मध्यभागा पासून निघतो.रथामध्ये नऊ नाथांची वेशभूषा परिधान लहान मुले 10 ते 20 वर्ष वयोगटातील विराजमान असतात.आणि एक दत्तगुरूंच्या वेशभूषेत असे एकूण नऊ नाथ (नवनाथ) आणि दत्तगुरु विराजमान असतात.तर दुसऱ्या रथात ज्यांनी ह्या रथयात्रेची सुरुवात मोठ्या भक्तीभावात केली.ते *स्वातंत्रसेनानी चिंतामण मास्तर* यांची तस्वीर विराजमान असते.अशा प्रकारे दोन्ही रथांचे प्रस्थान अगदी वाजत-गाजत अत्यंत भक्तीभावाने सुरू होते. रथ ओढण्याचा मान गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बैलजोडी ला मिळतो.रथाच्या पुढे गावातील *भजनी मंडळ,सनई च्या वाद्यावर गंगेच्या पाण्यानी भरून आणलेली कावड नाचवली जाते,त्या पुढे DJ बँजो च्या तालावर रंगांची उधळण करत नाचत तरुण,जेष्ठ सर्व जण ह्या रथयात्रेत सहभागी होत असतात.*
ह्या रथयात्रेत पंचक्रोशीसह महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक सहभागी होत असतात.
तर काही भाविक नवसपुर्ती साठी नाथांच्या रथा समोर लोटांगण घेत असतात.गावातील प्रत्येक घरासमोरून हे दोन्ही रथ पुढे-पुढे सरकत असतात.प्रत्येक घरापुढे सडा रांगोळी नाथांच्या रथाचे पूजन होत असते.दोन्ही रथांचे मनोभावे पूजन करून प्रत्त्येक जण नाथांच्या चरणी नतमस्तक होत असतो.साधारणतः दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिरवणूक गावाच्या मुख्य चौकात येते.संपूर्ण चौक गर्दीने फुलून गेलेला असतो.सर्व भाविक तिथे रंगांची उधळण करत वाद्यांच्या तालावर नाचत “”कानिफनाथ महाराजांचा””जय जयकार करत असतात.त्या नंतर काही वेळात नाशिक जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळ्या ध्वजकाठ्यांचे पूजन केले जाते मुख्य चौकात. त्या ध्वजकाठ्यां मध्ये सर्वात उंच काठी दरेगावच्या कानिफनाथ महाराजांची असते. त्याच वेळेस बऱ्याच नाथ भक्तांच्या अंगात देवाची हवा येते.डफाच्या तालावर देवाचे नामस्मरण केले जाते.हा सोहळा डोळे दिपवणारा असतो.संपूर्ण वातावरण नाथमय झालेले असते.हा प्रसंग बघण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक आलेले असतात.तो पर्यंत दोन्ही रथ पुढे-पुढे सरकत असतात.दुपारी 1 पर्यंत अर्ध्या गावाला भ्रमंती केलेली असते.संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालायला संध्याकाळ चे 5 वाजतात.
गावाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या नंतर हा रथ गावाच्या पश्चिमेला असलेल्या कानिफनाथ महाराजांच्या मुख्य मंदिराकडे जातो.तिथे गेल्यावर कानिफनाथ महाराजांची आरती होते.रथामध्ये विराजमान असलेल्या बाळगोपाळांची तिथे पूजा करून त्यांना तिथे महाप्रसाद दिला जातो……. 
…….अशा प्रकारे अत्यंत भक्तीभावात पंचमीचा दिवस पार पडतो. त्याच दिवशी गावातील मुख्य चौकात संपूर्ण रात्रभर रामलीलेचा कार्यक्रम पार पडतो. विविध देवांचे मुखवटे परिधान करून संबळ-पिपाणी च्या तालावर गावातील तरुण मंडळी देवी-देवतांची वेशभूषा करून पात्र साकारतात.हा कार्यक्रम कार्यक्रम बघण्यासाठी पंचक्रोशीतुन खूप लोक गर्दी करतात.रात्री 12 च्या सुमारास रामलीलेला सुरुवात होते…संपूर्ण रामायण कसे घडले ह्याचे प्रत्यक्षित गावातील तरुण मंडळी करून दाखवतात.ह्या संपूर्ण कार्यक्रमात गावातील जुन्या-जाणकार जेष्ठ नागरिकांची खूप मदत होते..वेशभूषा पासून ते भाषण पाठ करून सादरीकरण करेपर्यंत…
गावातील तरुण मंडळी ह्या रामलीलेच्या कार्यक्रमात उस्फुर्त सहभागी होऊन.कार्यक्रमाच्या 10/15 दिवस अगोदर पासून सराव सुरू करतात….
पहाटे रावणाचा वध करून रामलिलेचा कार्यक्रम संपतो..
ह्या मुखवट्यांना काही ठिकाणी *सोंग किंवा भोवाडा* असे पण म्हणतात.
पंचमीच्या दुसऱ्या दिवशी मुख्य मंदिराकडे कुस्त्यांचा फड भरतो.महाराष्ट्राच्या विविध भागातून पहिलवान (मल्ल)शड्डू ठोकत आपली ताकद आजमवायला येतात….ही कुस्त्यांची दंगल बघायला लोक तुफान गर्दी करत असतात.विजेत्या पहिलवानांचा दरेगाव गावकऱ्यांच्या वतीने रोख रक्कम बक्षीस देऊन योग्य सन्मान केला जातो.
त्याच वेळेस मुख्य मंदिराकडे यात्रा पण भरते.लहान मुलांच्या खेळण्या,मिठाई चे दुकाने,पाळणे,प्रसादाचे दुकाने तळ ठोकून असतात.हजारो भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.तसेच त्यावेळेस गावातील आणि बाहेर गावातील काही नाथ भक्त स्वखर्चाने भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करतात.
गावातील तरुण मंडळी हा महप्रसाद वाटण्यासाठी मदत करतात.
अशी ही *(दरेगाव,विश्राम मढी)* ची 5 दिवस चाललेली यात्रा मोठ्या उत्साहात नाथांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण गावाच्या सहकार्याने पार पडते.
*दरेगावची यात्रा जशी भव्य-दिव्य तसेच इथले मंदिर सुद्धा भव्य-दिव्य आहे.*
पहिले हे मंदिर गोलघुमट आकाराचे होते पुरातन स्वरूपाचे बांधकाम होते.नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.जीर्णोद्धार केलेल्या मंदिरावर विविध देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित आहे तसेच मंदिराचे काम पण काही प्रमाणात कोरीव आहे.मंदिराचा अर्धा भाग संगमरवराच्या दगडापासून बांधला आहे.मंदिराच्या अर्ध्या भागापासून ते कळसा पर्यंत अत्यंत सुरेख नक्षीकाम केले आहे.मंदिराची एकूण उंची 71 फुटांची आहे.मंदिरातील आतील भाग रंगेबीरंगी काचांनी तयार केला आहे.मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात *कानिफनाथ महाराजांची* मूर्ती पूर्वाभिमुख विराजमान आहे.मूर्तीचे व्यवस्थित निरीक्षण केले तर मूर्तीचे डोळे खरोखरचे डोळे भासतात.जणू कानिफनाथ महाराज आपल्याकडे बघत आहे असा भास होतो.मूर्तीचा चेहरा हसतमुख आहे.आपण जेव्हा मूर्तीच्या समोर जातो आपल्याला खूप प्रसन्न वाटते. आपल्याला आपला सर्व थकवा वाईट विचार निघून गेल्यासारखे वाटते.त्यावेळचा प्रसंग खूप प्रसंन्नदायी असतो की,तिथून निघण्याची इच्छाच होत नाही.
*तुम्ही मंदिरात कधीही गेलात तर तिथे नेहमी गारवा जाणवतो.*
दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यासाठी डावी कडून एक दरवाजा आहे.त्या नंतर मंदिराला प्रदक्षिणा देता येते.मंदिराच्या परिसरात नाथांचे निस्सीम भक्त यशवंत बाबा यांचे छोटे मंदिर आहे. अजून काही छोटे छोटे मंदिरे मुख्य मंदिराच्या जवळ आहे.
मुख्य मंदिरासमोरच भव्य असा सभामंडप आहे. सभामंडपा शेजारी एक मोठे *डाळिंबाचे* झाड आहे. ह्या झाडा बद्दल गावातील कुठल्याच जुन्या-जाणकार माहिती नाही नक्की हे झाड कोणी लावले होते.आणि कधी पासून आहे.ह्या झाडाचे वैशिष्ट्ये ह्या झाडावर कुठल्याही प्रकारची रोगराई आलेली नाही आत्तापर्यंत नाही कधी सुकले आहे.सदैव हिरवेगार असते.आणि याला फळे पण येतात.
बरेच भाविक नवसपूर्तीसाठी ह्या झाडाला सप्तरंगी धागा बांधतात.
*एक वेळ दरेगाव (विश्राम मढी) येथील कानिफनाथ महाराजांच्या ह्या मंदिरात अवश्य भेट दया…. नाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहील.*
ह्या वर्षी 12/3/2023 कानिफनाथ महाराजांची यात्रा भरणार आहे. ह्याच दिवशी रथ उत्सव बघण्याच भाग्य लाभणार आहे.
*दरेगाव (विश्राम मढी)ला येण्यासाठी मार्ग*
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »