त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी .

0

कैलास सोनवणे: त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी .

होळकर घराण्याचे वंशज राहणार उपस्थित

हिंदूधर्म रक्षणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तिथीनुसार 1 सप्टेंबर रोजी येत असल्याने सालाबादा प्रमाणे यंदा ही त्रंबकेश्वर येथे मोठया उत्साहात राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे हिंदूधर्म रक्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीने ठरविले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर मंदिरांचा जिर्णोद्धार केला व नव्याने काही मंदिरे उभारली तसेच विहिरी,बारव ,घाट , तलाव, धर्मशाळा बांधल्या असे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.


त्रंबकेश्वर नगरीमध्ये गंगातीर्थ,प्रयग तीर्थ, कुशावर्त अशा तीर्थक्षेत्रांची निर्मिती करून त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार , ब्रह्मगिरी वरील रस्ता मार्ग पिण्याची तळी यांची निर्मती करून होळकर शाई च्या पाऊलखुणा जागे ठेवले आहे. त्र्यंबकेश्वर येथील येणारी वाटसरू यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी नासिक ते त्रंबकेश्वर यादरम्यान आठ ते नऊ बारवांची निर्मिती केली ** नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथे अहिल्या रामघाट, कपालेश्वर मंदिर , अहिल्याराम मंदिर व इतर काही मंदिरांची उभारणी केल्याने नाशिक नगरीला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. शिव महादेवाच्या परमभक्त असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्रंबकेश्वर येथील त्रंबकराज ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला,ब्रह्मगिरी मंदिराची स्थापना केली. गणपती बारी तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथील घाट तसेच कुंभमेळ्याच्या सोयीसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर महामार्गावर विविध ठिकाणी धर्मशाळा , बारावा निर्माण केल्या व त्र्यंबक नगरी नव्याने वसविली तसेच त्रंबकेश्वरला धार्मिक महत्त्व प्राप्त करून दिले .धर्मरक्षणाचे इतके मोठे काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास झाकळला गेल्याने अहिल्यादेवी यांच्या कार्याची महती त्यांचा ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्रंबकेश्वर येथे धार्मिक टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी दिंडी सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रम ,कुशावर्त तीर्थाच्या ठिकाणी त्रंबकराज आरती ,अहिल्या आरती व गोदाआरती करून अहिल्या मातेच्या स्मारकास दुग्ध अभिषेक करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी सर्व धर्मीय जनता, साधुसंत, महात्मा, पुरोहित महासंघ, अहिल्या भक्त, शिवभक्त, वारकरी मंडळी, उपस्थित राहणार आहे.
तसेच अहिल्यादेवी यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी होळकर घराण्यातील वंशज हे देखील उपस्थित राहणार आहे. तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे व इतर होळकर घराण्याचे वंशज उपस्थित राहणार आहे. तसेच मातोश्रींच्या जीवनपटावर रामदास काळे यांचे व्याख्यान होणार
याप्रसंगी ताल विकास पखवाज वारकरी गुरुकुल त्रंबकेश्वर, माऊली ज्ञानराज अध्यात्मिक गुरुकुल संस्था, नारायणी वारकरी शिक्षण संस्था मुलींची त्र्यंबकेश्वर या वारकरी मंडळी उपस्थित राहून या पालखी दिंडी सोहळ्याची शोभा वाढवणार आहे
दिनांक 1 सप्टेंबर रविवार रोजी त्रंबकेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे व नियोजन करणे करता नियोजन बैठक पार पडली सदर बैठकीस सर्व समाज बांधव, उपस्थित होते सर्व पुरोहित महासंघ साधुसंत वारकरी मंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे ही विनंती असे समितीचे प्रमुख समाधान भाऊ बागल यांनी आव्हान केले. याप्रसंगी समितीचे सदस्य वैभव रोकडे, शाम गोसावी अण्णासाहेब सपना र पांडुरंग भडांगे, सागर भाऊ, किसन दडस सर, अमोल गजभार सर प्रशांत बागल सर भूषणभाऊ जाधव सागर भाऊ घोडके देवराम भाऊ रोकडे राजाभाऊ बदाड डॉक्टर कल्पेश शिंदे तसेच त्र्यंबक नगर वाशी उपस्थित होते 🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »