Organic Honey Collection : सेंद्रिय मध संकलनातून महिलांना रोजगाराच्या संधी

0

Organic Honey Collection : सेंद्रिय मध संकलनातून महिलांना रोजगाराच्या संधी

Honey Update : सेंद्रिय मध संकलनाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे.

Satara Honey News : सेंद्रिय मध संकलनाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे. कांदाटी खोऱ्यात मध उद्योगासाठी मोठी क्षमता उपलब्ध आहे.

विशेषकरून महिलांनी स्वजबाबदारी सांभाळून मध पेट्यातून मधमाश्‍या पाळून सेंद्रिय मध गोळा करून हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, असे मत तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी व्यक्त केले
मंडळाच्या महाबळेश्‍वर व मध संचालनालयाकडून ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत मधमाश्‍यापालन प्रशिक्षण आणि जन जागृती शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरात कांदाटी- कोयना खोऱ्यातील रेनोशी, खरोशी, कोठ्रोशी, दाभे, रुळे, आवळन आहिर, गावढोशी, दरे, निवळी, आकल्पे, लामज, वागावळे, ऊचाट, सालोशी आदी गावांतील सुमारे २०० मधपालक, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील म्हणाले, मध व्यवसाय करण्यासाठी ५० टक्के शासन अनुदान मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण विनामूल्य असून, महिला व पुरुष सर्वांसाठी उपलब्ध आहे.

कृषी पर्यवेक्षक एम. बी. पाटील, कृषी सहायक रिकेश पाटील यांनी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण दिले. सेंद्रिय मध संकलक नावनोंदणी करण्यात आली व मध केंद्र योजनेअंतर्गत मध पेट्यांची मागणी घेण्यात आली.
या वेळी सुनील नलावडे, आनंद नलावडे, विठ्ठल सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. आर्या नलावडे, प्रतीक कांबळे, शैलेश नलावडे, आर्यन नलावडे, उज्ज्वला सपकाळ या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच आवेश ढेबे, उपसरपंच लक्ष्मी नलावडे, पांडुरंग सुतार, तुळशीराम शेलार, शंकर मानाजी वाळणेकर, प्रकाश सपकाळ, विजय खरात, गजानन भोयर आदी उपस्थित होते. रघुनाथ नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील नलावडे यांनी आभार मानले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »