Mango Damage : रायगड जिल्ह्यात पावसामुळे आंबा पीक धोक्‍यात

0

Mango Damage : रायगड जिल्ह्यात पावसामुळे आंबा पीक धोक्‍यात

झाडाला आलेल्या कैऱ्या व मोहर गळून पडल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.
Raigad News : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्‍या अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची भीती आहे.
झाडाला आलेल्या कैऱ्या व मोहर गळून पडल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारनंतर ढग दाटून आले. संध्याकाळी सहानंतर अनेक भागात जोरदार वारा सुरू झाला. अलिबागसह काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाऊस पडला.
वादळी वाऱ्यासह आलेल्‍या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील कैऱ्या व मोहर गळून पडला. जिल्ह्यात आंबा लागवडीचे क्षेत्र जवळपास १२ हजार ५०० हेक्टर असून २० हजारांपेक्षा अधिक शेतकरी आंबा उत्पादक आहेत.पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पावसामुळे रोहे कोलाड मार्गावरील संभे गावजवळ भले मोठे झाड कोसळल्याने काहीकाळ रस्ता बंद होऊन वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मंगळवारी रोहे शहरात पावसाने हजेरी लावल्‍याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »