Indrayani Rice : इंद्रायणी तांदूळ चिकट आणि सुवासिक का असतो?

0
Indrayani Rice : इंद्रायणी तांदूळ चिकट आणि सुवासिक का असतो?
पूर्वी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता खादाड लोकांचं माहेरघर बनलंय. कोल्हापूरच्या मिसळीचे जास्त फॅन पुण्यातच असतील. गल्लीबोळात चुलीवरच्या मटनापासून चुलीवरच्या पिझ्झापर्यन्त अनेक रेस्टॉरंट फॉर्मात चालत आहेत. पुणेकरांची आणखी लाडकी गोष्ट म्हणजे इंद्रायणी तांदूळ (Indrayani Rice). मटणाच्या थाळी (Mutton Thali) बरोबर मस्त चिकट इंद्रायणी भात आणि त्यावर तुपाची धार. ब्रम्हानंदी टाळीच. अशा या पुणेकरांच्या लाडक्या इंद्रायणी तांदळाची गोष्ट (Story Of Indrayani Rice) तुम्हाला माहित आहे? आज बघूया.
पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी (Indrayani Ricer) वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी (Indrayani Fragrant Rice) हे नाव पडलं. मावळातील वडगाव दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. जर संदर्भ इतिहासाचा द्यायचा असेल तर मराठ्यांचे झुंजार सेनानी महादजी शिंदे (Mahadaji Shinde) यांचं नाव निघतं. ११७९ मध्ये पहिल्या मराठा-ब्रिटिश युद्धात मावळ प्रांतात महादजींनी गोऱ्या सैनिकांची धूळधाण केली. भेदरलेलं ब्रिटिश सैन्य याच वडगावमध्ये महादजींना सपशेल शरण आलं होतं.
पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी हे नाव पडलं. मावळातील वडगाव दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. जर संदर्भ इतिहासाचा द्यायचा असेल तर मराठ्यांचे झुंजार सेनानी महादजी शिंदे यांचं नाव निघतं. ११७९ मध्ये पहिल्या मराठा-ब्रिटिश युद्धात मावळ प्रांतात महादजींनी गोऱ्या सैनिकांची धूळधाण केली. भेदरलेलं ब्रिटिश सैन्य याच वडगावमध्ये महादजींना सपशेल शरण आलं होतं.
वडगावच्या भात संशोधन केंद्राचे पहिले शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव कळके हेच ‘इंद्रायणी’चे जन्मदाते. त्यांनी सलग १६ वर्षे या केंद्रात भातावर संशोधन केलं. डॉ. कळके यांच्या शास्त्रज्ञ चमूने १९८७ मध्ये आय.आर.८’ आणि आंबेमोहोर या दोन जुन्या भात वाणांचा संकर केला. त्यातून नवे सुवासिक इंद्रायणी वाण तयार झाले. सुवासाचा उत्तम प्रतीचा, चिकट आणि चवदार तांदूळ ही इंद्रायणीची ओळख निर्माण झाली आहे. इंद्रायणीला सुवास मिळाला तो आंबेमोहोर या पारंपरिक भात वाणापासून. आंबेमोहोर हा कुणा शास्त्रज्ञाने शोधलेला नाही. तो शेकडो वर्षांपासून मावळात आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »