Chiku Crop : चिकू फळांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

0

Chiku Crop : चिकू फळांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान


चिकू फळाचे (Chiku Fruit) उगमस्थान मेक्सिको हा देश असून तेथून इतर देशात त्याचा प्रसार झाला. महाराष्ट्रात चिकूची व्यापारीदृष्ट्या लागवड (Chiku Cultivation) प्रथम ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथे झाली.
भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र , कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत चिकू लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. चिकू लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाचा (Chiku Production) विचार करता महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात प्रामुख्याने कालीपत्ती या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. राज्यात चिकू फळांचा हंगाम मे-जून व जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान असतो.
काढणीनंतर अयोग्य हाताळणीमुळे साधारणपणे १६ ते २० टक्के फळांची नासाडी होते. त्यासाठी चिकू फळांचे काढणीनंतर योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

चिकू फळाच्या पक्वतेचे मापदंड ः
चिकूचे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. जर फळे योग्य पक्वतेच्या अगोदर काढली तर पिकत नाहीत व पिकली तरी त्यांची गुणवत्ता चांगली नसते. तसेच फळांची काढणी उशिरा केली तर ती जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत.
त्यासाठी फळांची काढणी योग्य पक्वतेला करणे अत्यंत आवश्यक असते. फळांच्या काढणीनंतरची गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य हे प्रामुख्याने पक्वतेवर अवलंबून असते.
फळे आकाराने पूर्णपणे वाढून त्यांची पिकण्याची क्रिया सुरू होऊ लागते, त्यास ‘फळांची परिपक्वता’ असे म्हणतात.
१) फळधारणेपासून ते फळ काढणीस तयार होईपर्यंत साधारणपणे १५० ते १६० दिवस लागतात.
२) काढणीस तयार झालेली फळे बटाट्याच्या रंगाची होतात.
३) फळाच्या खालील टोकाला असलेला काट्यासारखा भाग हात लावल्यास सहज गळून पडतो.
Also read:
चिकू विमा हप्त्याचा फेरविचार नाहीच 
४) काढणीस तयार फळांची साल नखाने खरडल्यास गर पिवळसर रंगाचा दिसतो.
५) काढणीवेळी फळांवर असलेला पावडरसारखा भाग निघून जातो.
६) तयार चिकू फळांमध्ये चिकाचे प्रमाण फार कमी होते.
चिकू फळांची काढणी ः
१) फळांची काढणी प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळी करावी. दुपारच्या उन्हामध्ये काढणी करणे टाळावे.
२) चिकूची काढणी मुख्यत्वेकरून हातानेच केली जाते. यामुळे काढणीवेळी योग्य काळजी घेतल्यामुळे फळांना कमी इजा होते.
३) चिकू फळांच्या काढणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांनी विकसित केलेल्या ‘अतुल’ झेल्याचा वापर करावा.
४) काही ठिकाणी चिकू काढणीसाठी स्थानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये एक व्यक्ती हाताने काढलेली फळे झाडाखाली पेंडा भरून ठेवलेल्या गादीवर टाकते.
तर दुसरी व्यक्ती ती फळे गोळा करून क्रेटमध्ये भरते. या पद्धतीने कमी वेळेत जास्त फळे काढली जात असल्यामुळे तिचा अधिक वापर होतो.
रसायनांची प्रक्रिया
फळ काढणीअगोदर चिकू झाडावर कॅल्शिअम क्लोराइड (०.१० टक्के) द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे फळांचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
फळांचे पूर्वशीतकरण ः
१) काढणीवेळी फळांमध्ये असलेली उष्णता काढून घेण्याच्या क्रियेस ‘पूर्वशीतकरण’ असे म्हणतात. ही क्रिया काढणीनंतर लवकरात लवकर होणे अत्यंत आवश्यक असते.
कारण पूर्वशीतकरण क्रियेस उशीर होईल तसा त्यांच्या फळांच्या साठवणुकीवर व प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
२) यामध्ये चिकू फळे शीतगृहामध्ये १० अंश सेल्सिअस तापमान व ९० टक्के आर्द्रतेला साधारण १० तास ठेवली जातात.
३) या क्रियेमुळे फळांची पिकण्याची क्रिया मंदावली जाऊन फळाच्या वजनात येणारी घट कमी
Also read:
चिकू पिकासाठी विमा योजना
फळांचे पॅकिंग ः
१) काढणीपश्‍चात व्यवस्थापनामध्ये फळांच्या पॅकिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पॅकिंग केल्याने फळांना एक प्रकारे संरक्षण मिळते.
त्यामुळे वाहतूक, साठवण व विक्री व्यवस्था या दरम्यान फळांना होणारी इजा टाळली जाते. तसेच आकर्षक पॅकिंगमुळे विक्रीवेळी ग्राहक मालाकडे आकर्षित होऊन मालाचा खप वाढतो.
२) स्थानिक बाजारपेठेतील चिकू पॅकिंगसाठी प्रामुख्याने बांबूच्या टोपल्या, लाकडी खोकी, क्रेट्सचा वापर केला जातो.
तर दूरच्या बाजारपेठेसाठी प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून किंवा पनेट्समध्ये फळे भरून त्यांची एकत्रित कोरूगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग होते. निर्यातीसाठी ४.५ ते १० किलो क्षमतेच्या कोरूगेटेड पेट्यांचा वापर केला जातो.
फळांची साठवण ः
१) चिकू हे अत्यंत नाशवंत फळ असल्याने काढणीनंतर योग्य काळजी न घेतल्यास सामान्य तापमानात १ ते २ दिवसांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही.
२) फळांची साठवण १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला केल्यास फळांना थंड तापमानाची इजा होण्याची शक्यता असते.
म्हणून त्यांची साठवण १२ ते १३ अंश सेल्सिअस तापमानास आणि ९० ते ९५ टक्के आर्द्रतेला केल्यास किमान ३ ते ४ आठवडे साठवून ठेवता येतात.
३) याशिवाय फळे नियंत्रित वातावरणात साठवणगृहादेखील साठवण करून ठेवता येतात. परंतु हे तंत्रज्ञान अत्यंत खर्चिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »