जवस

जवस इंग्रजीत लिनसिड (Linseed) अथवा फ्लॅक्स (Flax) ह्या नावांनी ओळखले जाते. प्राचीन काळी इजिप्त युरोपियन देश, काही प्रमाणात भारत इत्यादी देशात जवसाचे पिक फक्त त्यातून निघणाऱ्या सालीपासून काढण्यात येणाऱ्या धाग्यापासून कापड विणण्याकरता पेरले जात असे. त्यातील बियातून तेल निघते ही माहिती त्याकाळी नव्हती. ही कॅन्डेल आणि मॅथुज (१९०७) ह्याच्या पाहणीनुसार सुमारे ४५०० वर्षे पूर्वीपासून इजिप्तमध्ये जवसाच्या धाग्यापासून कापड विणले जात होते. इजिप्तमधील ममींच्या कपड्यावरून यांनी हे अनुमान केले आहे.
जवसाची उत्पत्ती कोठे व कशी झाली याबद्दल आजही विश्वासपात्र दाखले सापडत नाहीत. कॉन्डेल यांच्या पाहणीत जवसाच्या रानटी जाती दक्षिण इराण (पराशिया) व किमिया (Crimea) भागात आढळल्या. भारतात जवस किती प्राचीन काळापासून उगवत होते याबद्दल अजूनही वाद कायम आहेत. असे म्हटले जाते कि आर्य लोकांनी भरत खंडात जेव्हा प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कापड विणण्याकरता धागा उपलब्ध व्हावा म्हणून जवसाची जात आपल्या बरोबर आणली हा दाखला काही वैदिक काळातील अहवालात सापडला. अशीही एक शक्यता म्हटली जाते की जवसाची एक जात लिनम युसिस्टेंटिस्टेटम (Linum Usistatisstetum) हीआर्य लोकांनी आपल्याबरोबर भारतात आणली आणि दुसरी जात लिनम स्ट्रीक्टम (Linum Strictum) अफगाणिस्तानात त्याकाळी अस्तित्वात होती. अशा ह्या दोनी जाती आर्य ज्या वाटेने भारतात शिरले त्या भागात एकत्र पेरल्या जात असाव्यात भारतात उत्तरेकडील भागात ज्या जाती पेरण्यात येतात त्या उंच जाती असतात. लिनम युरेटीकम जात युरोपखंडात पेरण्यात येते त्या जातीशी लिनम स्टिटम बरोबर संकर तसेच लिनम पेरेनी (Limum Perenna) ह्या जातीबरोबर संकर करून त्यातून तेल देणाऱ्या जातींची पैदास करण्यात आली असावी.
वनस्पती शास्त्र :
भारतात सर्वत्र पेरली जाणारी जवसाची जात वैज्ञानिक नाव लिनम युसिस्टॅटिस्टेटम (Linum Usistatisstetum) या नावाने ओळखली जाते. अंती प्राचीन काळापासून भारतात आणली गेल्यामुळे संस्कृतमध्ये उभा अटासी, बुटासी, तिलोत्तमा, मालिका, पारपती ह्या अनेक नावानी संबोधली जाते. हिंदीत आलसी, तीसी, चिकना, बिचरी इत्यादी अनेक नावे भारताच्या वेगवेगळ्या भागात आहेत.
जवसाचे मुळ कुटुंब लिनासी (Linacce) ह्यात जवळ जवळ १५० जाती आहेत, त्यापैकी फक्त १०० जातींची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. युरोप खंडात व भारतात पेरल्या जाणाऱ्या अगदी वेगळ्या पद्धतींतून भारतात वर्गीकरण केले आहे. पण हचिनसन (१९४८) ह्यांनी केलेले वर्गीकरण सर्वमान्य समजले जाते. त्यांच्या अभ्यासातून एन्जीयोस्परमे ( Angriospermae) हा त्याचा मूळ पितर समजला जातो. लिगसोनी (Lignosde ) ह्या वर्गातील लिनीएसी हे त्याचे कुटुंब ह्याप्रमाणे केलेले आहे. हुक (१९०३) ह्याच्या वर्णनाप्रमाणे मोठा परीघ (२५ मि.मी.) व निळ्या रंगाचे फूल असलेली एक जात लायनम युसीटॅटीस्टेटम् व दुसरी लहान परीघ (८.९ मि.मी.) व पिवळ्या रंगाची फुले असलेली जात लायनम् म्हैसोरेन्स ह्या दोन्ही भारतात पेरल्या जाणाऱ्या जाती आहेत.
ह्याबरोबरच शोभिवंत फुलाकरिता आणखी दोन जाती भारतात आयात झालेल्या आहेत.
१) लायनम ऍम्बेस्टीफोटॅलम (L. angustitalum)
२) लायनम ग्रॅन्डीफ्लोरम (L. grandiflorum) भारतात शेतीयुक्त ठरलेली जात
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »