Nimboli Ark : निंबोळी अर्क कसा तयार करावा?

0

Nimboli Ark : निंबोळी अर्क कसा तयार करावा?

NeemSeed : निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत.
Nimboli Ark Prepartion : गावखेड्यात, शेताच्या बांधावर कडूनिंबाची (Neem) भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या (Neem Seed Kernal) सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क (Neem Seed Kernal Extract) घरच्याघरी तयार करता येतो.
आवश्यक सामुग्री
५% शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी
# कडुनिंबाच्या निंबोण्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
# पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
# साबण (२०० ग्रॅम)
# गाळण्यासाठी कापड
बनवण्याची पद्धत
1)गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ ) घ्या
2)त्या दळून त्यांची पावडर बनवा
3)१० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
4)दुसर्याू दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
5)दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा
6)ह्यामध्ये १% साबण घाला (प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा)
7)चांगले ढवळून वापरा
 
टीप
*निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा
*आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही
*नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
*योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो     फवारा.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »