Photosynthesis प्रकाश संश्‍लेषणाची सांकेतिक भाषा ओळखण्यात यश

0

Photosynthesis : प्रकाश संश्‍लेषणाची सांकेतिक भाषा ओळखण्यात यश

संशोधकांना प्रकाश संश्‍लेषणाच्या (Photosynthesis) प्रक्रियेतील गुप्त संकेत व संदेशाच्या देवाणघेवाणीची भाषा समजून घेण्यात यश आले आहे. केंद्रकाकडून पेशींच्या अन्य अवयवापर्यंत संदेश वहनाचे काम करणारी चार प्रथिने संशोधकांनी शोधली आहेत. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’ (Nature Communication) या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
कम्युनिकेशन्स’ (Nature Communication) या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
Solar Light Insect Traps : सौर प्रकाश किटक सापळे फायदेशीर…
प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचे रूपांतर हे शर्करेमध्ये केले जाते. या प्रक्रियेमध्ये वनस्पतीतील वेगवेगळ्या यंत्रणा एकमेकाशी समन्वयाने काम करत असतात. हा समन्वय ठेवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये अनेक संदेश पाठवले किंवा स्वीकारले जातात. त्यांची भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून गेल्या पाच दशकांपासून सुरू आहे.
तेव्हापासूनच वनस्पतिशास्त्रज्ञांना वनस्पती पेशीतील केंद्रक हे पेशीतील अन्य घटकांना प्रकाश संश्‍लेषणासाठी संदेश पाठवत असल्याचे माहीत आहे. असे संदेश घेऊन जाण्याचे काम प्रथिने करत असतात. या प्रथिनांशिवाय वनस्पती वाढूच शकणार नाही. या प्रक्रियेविषयी माहिती देताना वनस्पतिशास्त्राचे प्रोफेसर मेंग चेन यांनी सांगितले, की वनस्पती पेशीचे केंद्रक शेकडो प्रथिनांच्या साह्याने अन्य घटकांना संदेश पाठवण्याचे काम करत असते. त्यातील नेमक्या कोणत्या प्रथिनांमुळे प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया कार्यान्वित होते, हे शोधणे आव्हानात्मक काम होते. हे गवताच्या गंजीमध्ये एखादी सुई शोधण्याइतकेच अवघड काम होते.
चेन यांच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेला कार्यान्वित करणाऱ्या चार प्रथिनांची ओळख पटवली आहे. या पूर्वी केलेल्या संशोधनामध्ये चेन यांच्या गटाने वनस्पती केंद्रकातील प्रकाशामुळे कार्यरत होणाऱ्या काही प्रथिनांचा शोध लावला होता. प्रकाश पडताना या प्रथिनामुळे प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया सुरू केली जात होती. नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये या प्रक्रियेतील चार प्रथिनांची ओळख पटवली. या प्रथिनाद्वारे नेल्या जाणाऱ्या संदेशामुळे पेशीतील काही घटकांचे रूपांतर हे हरितद्रव्यांमध्ये (क्लोरोप्लास्ट) होते. हीच हरितद्रव्ये पुढे प्रकाश संश्लेषणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.
प्रकाश संश्‍लेषण नव्हे एखादी सिंफनी
चेन यांनी संपूर्ण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेची तुलना एखाद्या सुनियोजित संगीत रचनेसारखी (सिंफनी) केली आहे. ‘‘संगीत संरचनेच्या संयोजकाप्रमाणे केंद्रकातील प्रकाश ग्रहण करणारी (फोटो रिसेप्टर) प्रथिने काम करतात. त्यातही प्रकाशातील लाल आणि निळ्या रंगाच्या प्रकाशासाठी संवेदनशील असलेले फोटो रिसेप्टर ही प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेला सुरुवात करतात. ही प्रथिने प्रकाश संश्‍लेषणाचे मूळ असलेल्या हरितद्रव्याच्या ब्लॉक्स तयार करणाऱ्या जनुकांना कार्यान्वित करतात.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »