निशीगंध लागवड तंत्र

0

निशीगंध

जाती : सिंगल (एकेरी पाकळ्याचा): रजत रेखा, श्रृंगार, प्रज्वल, फुले रजनी, 
डबल (दुहेरी पाकळ्याचा) सूवर्ण रेखा, डबल पर्ल, सुवासिनी, वैभव जमीन मध्यम, उत्तम निचरा होणारी.
लागवडीचा हंगाम : एप्रिल-मे. अभिवृध्दी: कंदापासून
हेक्टरी बियाणे / कंद : २.५ लाख कंद (२० ते ३० ग्रॅम वजनाचे) 
लागवडीचे अंतर : २०x२० सें.मी., सपाट वाफ्यात. रासायनिक खताची मात्रा : २०० : ३००:२०० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टर. पैकी नत्र चार समान हप्त्यामध्ये (प्रत्येकी ५० कि.) लागवडीच्या वेळी, ४५, ९० आणि १३५ दिवसाने तसेच स्फुरद व पालाश दोन समान हप्त्यामध्ये विभागून (प्रत्येकी १५० कि. स्फुरद व १०० कि. पालाश अनुक्रमे) लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावे. लागवडीपूर्वी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीपूर्वी कंद जिर्बेलिक अॅसिड-३ या संजीवकाच्या १२५ पीपीएम तिव्रतेच्या द्रावणामध्ये २४ तास बुडवून लावल्यास फुलदांडे व कंदाचे उत्पादन वाढते.
 फुले येण्याची वेळ : कंद लागवडीनंतर ७५ ते ९० दिवसात फुलांचे दांडे पडू लागतात. 
हेक्टरी उत्पादन : ३ ते ४ लाख दांडीची फुले किंवा १० ते १२ मे. टन मोकळी फुले.
धन्यवाद
🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »