दोडका लागवड व तंत्रज्ञान
प्रस्तावना
दोडका
या सारख्या वेलभाज्यांना मांडव बांबू इत्यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. महाराष्ट्रामध्ये कारल्याच्या अंदाजे 453 हेक्टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्टर क्षेत्र आहे. कार्ल्याला परदेशात व मोठया शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते.
हवामान
या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो.
जमीन
भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.
पूर्वमशागत व लागवड
जमीनीची उभी आडवी नांगरट करून तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्वच्छ करावे. तद नंतर प्रति हेक्टरी 100 ते 150 क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टखत टाकावे. कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे. कारल्याची लागवडीसाठी दोन ओळीत 1.5 ते 2 मिटर व दोन वेलीत 60 सेमी अंतर ठेवावे. दोडक्यासाठी दोन ओळी 2.5 ते 3.5 मिटर वर दोन वेलीत 80 ते 120 सेमी अंतर ठेवतात. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत. बिया वरंब्याच्या बगलेत टोकाव्यात. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे.
हंगाम
कारल्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी फेब्रूवारी महिन्यात करतात. उशिरात उशिरा मार्चमध्ये सुध्दा लागवड करतात. खरीपाची लागवड जून जूलै महिन्यात करतात. दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते
वाण
दोडका
पुसा नसदार : या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात. या जातीस 60 दिवसांनी फूले येतात. प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात.
को-१ : ही हळवी जात असून फळे 60 ते 75 सेमी लांबीची असतात. प्रत्येक वेलीस 4 ते 5 किलो फळे लागतात.
या शिवाय पुसा चिकणी कोण हरिता, फुले सूचेता तसेच स्थानिक जाती लागवडीयोग्य आहेत.
बियाण्यांचे प्रमाण
दोडक्यासाठी हेक्टरी 3 ते 4 किलो ग्रॅम बियाणे लागते.
खते व पाणी व्यवस्थापन
दोडका पिकासाठी प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फूरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावेत. व नत्राचा 25 ते 30 किलोचा दुसरा हप्ता 1 महिन्याने द्यावा.
आंतरशागत
झाडा भोवतालचे तण काढून स्वच्छता ठेवावी, जमिन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा. तसेच तारांवर सुध्दा वेली पसरवून त्यापासून चांगला नफा मिळविता येतो.
रोग व कीड
रोग : या पिकांवर प्रामुख्याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप -1 मिली. 1 लिटर पाण्यातून फवारावे तसेच केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन झेड 78 हेक्टरी औषध 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे.
किडी : या पिकांवर प्रामुख्याने तांबडे भुंगिरे, फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. पाने खाणारी आळीच्या नियंत्रणासाठी ट्रायअॅझोफॉस 2 मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. फळ माशीच्या नियंत्रणासाठी मेलॉथिऑन 2 मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.
काढणी व उत्पादन
लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलावर येतो. पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत. नखाने हळूच दाबल्यावर व्रण पडतो. ती फळे कोवळी समजावीत. दोडक्याचे हेक्टरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.
धन्यवाद
🙏🙏🙏🙏